Akhilesh Yadav on BJP women reservation statement Sarkarnama
देश

Nari Shakti Vandan Act: रेखा गुप्ता दिल्लीच्या अर्ध मुख्यमंत्री! भाजपकडून नारीला 'नारा' बनवण्याचा उद्योग सुरु; अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

BJP women reservation: सरकारनं लोकसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं असून आज यामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं. या विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare

BJP using Nari Shakti as political slogan analysis: सरकारनं लोकसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं असून आज यामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकांतर्गत १३१ वी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे. या विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे.

या चर्चेमध्ये विरोधकांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली असून आमचा महिला विधेयकाला पाठिंबा आहे पण जनगणना झालेली नसताना मांडण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यंमत्री अखिलेश यादव यांनी यावरुन सकारचा चांगलंच धारेवर धरलं आहे. महिला आरक्षणाच्या आडून सरकार नारीचा 'नारा' बनवत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

अखिलेश यादव म्हणाले, सपा महिला आरक्षणासोबत आहे. पण भाजपच्या चालबाजीविरोधात आहे. घटनादुरुस्तीच्या नावाखाली हे यासाठी घाई करत आहेत कारण यांना जनगणना करायची नाही. जर जनगणना झाली आणि त्यात मागासवर्गीयांची लोकसंख्या मोजली तर त्यापैकी अर्धी लोकसंख्या ही ३३ टक्के असेल. याचा अर्थ भाजप मागासवर्गातील ३३ टक्के महिलांना त्यांचा अधिकार देऊ इच्छित नाहीत.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेवर बोलताना यादव म्हणाले की, हे लोक मतदारसंघांचा नकाशा बदलू पाहत आहेत, त्यांनी संपूर्ण रणनीती बनवली आहे, कारण त्यांना राजकीय फायदा मिळू शकेल. त्यामुळं आमची इच्छा आहे की आधी जनगणना झाली पाहिजे त्यानंतर जेव्हा सर्व घटकांची आकडेवारी समोर येईल, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना होईल, त्यानंतरच महिला आरक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.

आमची मागणी आहे की, अर्ध्या लोकसंख्येमध्ये मागासवर्गीय आणि मुस्लिम महिलांना देखील जोडलं जावं. पण सर्वात आधी जनगणना व्हायला हवी, जर तुम्ही हे करणार नसाल तर तुम्ही देशाला फसवत आहात.

त्यांची संपूर्ण तयारीच झालीए की, विधेयक मंजूर झालं की, कोणता लोकसभा मतदारसंघ कसा असेल. त्यांनी आधीपासूनच नकाशा तयार करुन ठेवलाय. त्यामुळं महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच हा नकाशा लागू केला जाईल.

भाजप नारीला नारा बनवण्याचं काम करत आहे. भाजप आरक्षणावरुन नारीचा नारा बनवू पाहत आहे. तसंच बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी आपल्या संघटनेत महिलांना स्थान दिलेलं नाही. ज्या पितृसंघटनेतून भाजपचा जन्म झाला आहे, या संघटनेत मानसन्मान मिळालेल्या किती महिला आहेत?

असा सवालही यावेळी अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. यावेळी अखिलेश यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा उल्लेखही करताना त्या हाफ चीफमिनिस्टर आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपकडून केवळ नावालाच महिला मुख्यमंत्री बनवण्यात आल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT