Ambedkar Jayanti News: आंबेडकर जयंती मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर; शिवसेना आक्रमक, इम्तियाज जलील म्हणतात, 'कोणते कलम लावणार?

Shivsena Vs AIMIM Aurangzeb poster in Ambedkar Jayanti procession: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकल्याने वाद निर्माण झाला आहे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी त्याच समर्थन केले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Chhatrapati Sambhaji Nagar MahapalikaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक उत्साहात, शांततेत पार पडली असताना एका अज्ञात व्यक्तीने औरंगजेबाचे पोस्टर मिरवणूकीत झळकावले आणि एकच खळबळ उडाली. पोस्टर झळकावणाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी औरंगजेबचे फोटो झळकावणारा आणि याचा व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अशा दोघांवरही कडक कारवाईची मागणी केली. यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संविधानाने प्रत्येकाला काय बोलावे, कसे वागावे, कोणाचा फोटो झळकवावा याचा अधिकार दिला असल्याचे म्हणत या वादात उडी घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत हा प्रकार घडल्याचे सांगीतले जाते. मी स्वतः तो फोटो किंवा ती व्हिडिओ क्लीप पाहिलेली नाही. बाबासाहेबांच्या मिरवणूकीत जर एखाद्या तरूणाने औरंगजेबाचा फोटो झळकावला असेल तर त्याला हेच सुचवायचे असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानूसार या देशात प्रत्येकाला कसे राहावे, वागावे, बोलावे याचा अधिकार दिलेला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Ahilyanagar ACB News: इकडे कुठे? म्हणत ACBला चकवायचा प्रयत्न फसला! आठ वर्षांत दुसऱ्यांदा सापडला

या अधिकारातूनच संबंधित तरुणाने हा फोटो झळकावला असेल. राहिला प्रश्न ज्या महान नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे, त्यांनी ही कारवाई कोणत्या कलमा खाली करावी, हे ही सांगितले पाहिजे, असा टोला राजेंद्र जंजाळ यांना काढला. औरंगजेबाचा फोटो झळकावणाऱ्यावर कायद्याने काय कारवाई करायची ती पोलीसांनी करावी, मी हा विषय त्यांच्यावर सोडतो, असे सांगत इम्तियाज यांनी या वादावर अधिक भाष्य करणे टाळले.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Santosh Bangar News: मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, फोनही उचलत नाहीत; त्यांना घरी बसवा! शिंदेंसमोरच बांगर यांची डरकाळी..

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान वादग्रस्त प्रकार समोर आला होता. मिरवणुकीत एका तरुणाने औरंगजेबाचा फोटो झळकवत रील तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वातावरण तापले असून नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. संबंधित तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी विविध संघटना आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com