BJP MLA Controversy : 'राष्ट्रवादीचा मंत्रीच जिल्ह्यातून ‘भाजप’ संपवत आहे?', फडणवीसांच्या आमदाराचे मुश्रीफांवर गंभीर आरोप

BJP MLA allegations against Hasan Mushrif: गेल्या काही दिवसांपासून ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी आली आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदारानेच केली आहे.
Navid Mushrif, Gokul Milk; Hasan Mushrif
Navid Mushrif, Gokul Milk; Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आमदार शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.

  2. गोकुळ डेअरीच्या निधीतून भाजपला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला.

  3. या आरोपांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra political clash BJP vs NCP 2026: हसन मुश्रीफ महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. परंतु, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचा धर्म पाळलेला नाही. जिल्हा परिषद व इतर निवडणुकींत प्रत्येक तालुक्यात त्यांनी महाविकासच्या घटक पक्षांशी संधान बांधून निवडणुका लढविल्या व जिंकल्या. 'खायाचं महायुतीचं, गुणगाण मात्र महाविकासचं' असे ते वागत आहेत. त्यांचे सुपुत्र ‘गोकुळ’चे चेअरमन असून ते स्वतः मंत्री आहेत. त्यांच्या जोडीला आणखीन कोण आहे, हे शोधावे लागेल.

गोकुळ’ मधील पैशांतून जिल्ह्यात ‘भाजप’ला संपविण्याचा प्रयत्न मुश्रीफ करीत आहेत, असा आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी गडहिंग्लज येथे केला. यावेळी हेमंत कोलेकर यांनीही डिबेंचर कपात व संस्थांकडून येणाऱ्या वासाचे दूध जप्त मुद्द्यांवर सत्तारुढांवर आरोप केले. माजी मंत्री भरमू पाटील उपस्थित होते.

आमदार शिवाजी पाटील म्हणाले, मंत्रिपदाचा गैरवापर करून मुश्रीफांचा मनमानी कारभार करत आहेत. त्यांची सर्वच गिळकृंत करण्याची प्रवृत्ती आहे. युती धर्म म्हणून आम्ही एक-दीड वर्षे त्यांचा अन्याय सहन केला आहे. पण आता महायुतीमध्ये राहून त्यांचे ‘भाजप’विरोधी काम यापुढे चालणार नाही.

Navid Mushrif, Gokul Milk; Hasan Mushrif
Hasan Mushrif News: चाकणकरांनतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? राष्ट्रवादीचा दावा कायम; मुश्रीफ म्हणाले....

‘गोकुळ’मध्ये बेकायदा वाढविलेल्या दूध संस्थांमुळे जुन्या संस्थांवर आणि गडहिंग्लज उपविभागाच्या प्रतिनिधी पदांवरही अन्याय होणार आहे. काही तालुक्यांचीच मक्तेदारी ‘गोकुळ’मध्ये राहणार असून ‘गोकुळ’मधील घोटाळ्याबाबत बरीच पत्रे, अनेक पुरावे योग्य वेळी ते बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘भाजपमुक्त’ ‘राष्ट्रवादी’ची भूमिका

पाटील म्हणाले, काँग्रेसमुक्त भाजप हे भाजप नेत्यांचे धोरण आहे; परंतु, नेमके याच्या उलटे भाजपमुक्त राष्ट्रवादी काँग्रेस अशी मुश्रीफ यांची भूमिका आहे. मुश्रीफ महायुतीत राहून भाजपविरोधी भूमिका घेत आहेत. अनेक निवडणुकींत त्यांची भूमिका भाजपला संपविणारी आहे. हा प्रकार गांभीर्याने घेऊन आता भाजपचे वरिष्ठ नेतेच मुश्रीफ यांच्याबाबत काय, तो निर्णय घेतील.

बोलवता धनी लागत नाही...

पाटील म्हणाले, भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बोलण्यासाठी ‘बोलवता धनी’ लागत नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर शांत बसत नाही. ‘गोकुळ’विषयीचे गैरसमज कधीच दूर होणार नाहीत. ही केवळ सुरुवात आहे. मुख्य चित्रपट यापुढे बघायला मिळेल. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासारखे कणखर नेतृत्व आहे. त्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही. या संघर्षातही ते माझ्या पाठीशी राहतील, असा विश्वास आहे.

अधिकारी बदलले...

मुश्रीफ यांनी उपनिबंधक (दुग्ध) माळवदे यांची तडकाफडकी बदली करून या पदावर सुजय कदम यांना आणले. कोकणात ४०० दूध संस्थांचे कामकाज पाहणारे हे अधिकारी मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक आहेत. मंत्रिपदाच्या नावाखाली मुश्रीफ यांचा मनमानी कारभार जनता समजून आहे. त्यामुळे कदम यांचीही बदली लवकरच होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Navid Mushrif, Gokul Milk; Hasan Mushrif
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या डोक्यात सतेज पाटलांसोबत सत्तास्थापनेचा विचार? कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या वाटचालीचे चित्र क्लिअर

FAQs :

1. हसन मुश्रीफ यांच्यावर काय आरोप करण्यात आले आहेत?
महायुतीत असूनही विरोधी पक्षांसोबत काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2. आरोप कोणी केले आहेत?
भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी हे आरोप केले आहेत.

3. गोकुळ डेअरीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
गोकुळच्या निधीचा राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप आहे.

4. या प्रकरणामुळे काय परिणाम होऊ शकतो?
जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

5. इतर कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले?
डिबेंचर कपात आणि दूध जप्तीच्या मुद्द्यांवरही सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com