Police arrest Naxal sympathizer in Nagpur hotel for anti-Indian Army post after Operation Sindhur Sarkarnama
देश

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय लष्कराविरोधात गरळ ओकणाऱ्या नक्षल समर्थक पत्रकाराला नागपुरातून अटक

Naxal Supporter Arrested : ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सैन्यविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकणाऱ्या नक्षल समर्थक तरुणाला नागपुरात अटक करण्यात आली आहे. अटक केलेला तरूण स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Nagpur News, 09 May : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सैन्यविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकणाऱ्या नक्षल समर्थक तरुणाला नागपुरात अटक करण्यात आली आहे. अटक केलेला तरूण स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रेझाम माडेपट्टी शिबा सिदीकी असं 26 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याला नागपुरातील (Nagpur) एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. अटक केलेला तरूण मूळचा केरळमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक हा काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता.

या परिषदेत समाजविरोधी कारवाया करणाऱ्या पत्रकारांच्या सुटकेसाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तो नक्षल समर्थक लोकांनाही भेटल्याची माहिती समोर आली आहे. सिदीकी हा डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशनशी संबंधित असून दिल्लीहून परतल्यानंतर तो नागपुरात त्याच्या एका मैत्रिणीला भेटल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

लकडगंज पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळताच त्यांनी लगेच या तरूणाला एका हॉटेलमधून अटक केली. जातीय भेदभाव, सांप्रदायिक हिंसाचार, राज्य दडपशाही, यासारख्या विषयाला तो 'मकतूब मीडिया द ऑब्जरवर पोस्ट' यासारख्या आउटलेटसाठी लिखाण करायचा.

ऑपरेशन सिंधूरनंतर त्याने दोन बंदुकीसह फोटो काढत ते सोशल माध्यमांवर पोस्ट केले होते. भारतीय सैन्याविरोधात लिखाण करत भारतीय लष्कर पाकिस्तानातील निष्पाप लोक आणि मुलांना मारत आहे, अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT