India Attack On Pakistan: भारतीय लष्कर दमदार! हल्ल्यापुढे पाकिस्तान हतबल, पंतप्रधान शरीफला बंकरमध्ये लपण्याची आली वेळ!

Pakistan PM Shehbaz Sharif Forced Into Bunker : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर याच्या कुरापतीमुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्याला पदावरून हटवल्याचे तसेच त्याला ताब्यात घेतल्याचे देखील वृत्त आहे.
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif reportedly takes shelter in a bunker during rising India-Pakistan war tensions.
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif reportedly takes shelter in a bunker during rising India-Pakistan war tensions.Sarkarnama
Published on
Updated on

India-Pakistan War : ऑपरेशन सिंदूर पार्ट दोन सुरूच आहे. पाकिस्ताने भारतीय शहरांवर हल्ला करण्याच प्रयत्न केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी ड्रोनला हवेतच नष्ट केले. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना गुरुवारी रात्री भारताने जोरदार हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर मारा केला. तर, पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये देखील जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला.

भारतीय लष्कराच्या हल्ल्याने भेदरलेल्या शहबाज शरीफ याला सुरक्षेसाठी बंकरमध्ये लपण्याची वेळ आली. पाकिस्तानेच पंतप्रधान शहबाज शरीफचे घर असलेल्या परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचे काही मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif reportedly takes shelter in a bunker during rising India-Pakistan war tensions.
America On India vs Pakistan: भारतानं थेट लाहोर,कराचीपर्यंत घुसुन दणका दिल्यानंतर पाकिस्तानची उरलीसुरली इज्जतही अमेरिकेनं काढली

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर याच्या कुरापतीमुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्याला पदावरून हटवल्याचे तसेच त्याला ताब्यात घेतल्याचे देखील वृत्त आहे. त्याच्यावर पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा खटला चालणार असल्याची माहिती आहे. पाकिस्तान भेदरला असून भारताकडून होणारी कारवाई थांबण्याची विनंती त्याने अमेरिकेला केली आहे.

कराची बंदरावर हल्ला

भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत समुद्रमार्गी देखील प्रत्युत्तर देण्यात आले. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानचे कराची बंदरावर जोरदार हल्ला चढवला. कराची बंदरावर एकामागून एक स्फोट होत होते. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने कराची बंदरावर हल्ला चढवला आहे.

पाकिस्तानी पायलट भारताच्या ताब्यात

पाकिस्ताने भारताच्या सीमेलगत असलेल्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे 50 ड्रोन पाडले. पाकिस्तानचे तीन लढाऊ विमानं देखील पाठण्यात आली असून एक पायलटला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif reportedly takes shelter in a bunker during rising India-Pakistan war tensions.
India Attack On Pakistan: भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच ताब्यात घेतलं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com