India Pakistan War : भारतावर केलेला ड्रोन हल्ला पाकिस्तानच्या अंगलंट! लष्कराने थेट राजधानी इस्लामाबादलाच केलं लक्ष्य, मध्यरात्री नेमकं काय काय घडलं?

India Strikes Back After Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. भारताने केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया करायला सुरूवात केली आहे.
India Pakistan conflict
Indian Air Force jets strike deep into Pakistan territory under Operation Sindoor after the Pahalgam terror attack.Sarkarnama
Published on
Updated on

India Pakistan Conflict : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. भारताने केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया करायला सुरूवात केली आहे.

मात्र, पाकिस्तानचे सर्व प्रयत्न भारताने उधळून लावले आहेत. गुरुवारी (ता.08) मध्यरात्री पाकिस्तानकडून भारतातील प्रमुख शहरे लक्ष्य करण्यात आली. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांचे सर्व ड्रोन हल्ले निष्प्रभ ठरवले.

पाकिस्तनाच्या कारवाईनंतर भारताने थेट पाकची राजधानी इस्लामाबादवर हल्ले केले. यानंतर भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अनेक भागांमध्ये ब्लॅकआऊट जारी करण्यात आलं आहे.

India Pakistan conflict
India Vs Pakistan: भारतीय सैन्य पीओकेमध्ये 60 किलोमीटर आत घुसले! पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घराजवळ मोठा स्फोट

पाकिस्तानची लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने भारतातील 15 शहरांना टार्गेट करत मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे नापाक इरादे भारताने हवेतल्या हवेत उधळून लावले. यामुळे चिडलेल्या पाकिस्तानी सैन्याने रात्रभर गोळीबार करायला सुरूवात केली. त्याला भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिलं.

गुरूवारी रात्री नेमकं काय घडलं?

8 मे रोजी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील एकूण आठ ठिकाणांवर मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सतवारी, अर्णिया, सांबा आणि आर. एस. पुरा यांचा समावेश होता. मात्र, हे मिसाईल भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच उद्ध्वस्त केली. इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीम लाँच करत भारताने पाकची मिसाईल हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली.

India Pakistan conflict
India Attack On Pakistan: भारतीय लष्कर दमदार! हल्ल्यापुढे पाकिस्तान हतबल, पंतप्रधान शरीफला बंकरमध्ये लपण्याची आली वेळ!

त्यानंतर पाकिस्तानने सिमेवर जोरदार गोळीबार करायला सुरूवात केली. याला भारतीय लष्कराने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर जम्मूमध्ये गुरुवारी संध्याकाळी ब्लॅकआऊट करण्यात आलं. तर सुरक्षेचा उपाय म्हणून गरज नसताना प्रवास करणं टाळा असं आवाहन पोलिस आणि लष्कराने जम्मूतील नागरिकांना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com