Sharad Pawar and Ajit Pawar  Sarkarnama
देश

NCP Crisis News: राष्ट्रवादी कुणाची ? अजित पवार गटाला आयोगाचा खडा सवाल; सुनावणीवेळी काय घडलं ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं ? सुनावणीला वेग

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुरु झालेल्या दोन्ही गटातील संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीला आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं ? यावरील सुनावणी दरम्यान मंगळवारी अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद करत अनेक सवाल उपस्थित केले. तर आयोगानेही अजित पवार गटाला अनेक सवाल विचारले.

गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवारांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद करत पक्ष संघटनेच्या विस्तारात अजित पवारांची कोणतीही भूमिका नसून पक्षावर कब्जा करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजच्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनीही युक्तिवाद करत अनेक सवाल उपस्थित केले. "2019 ला पहाटेच्या शपथविधीवेळी सर्व आमदार हे भाजपसोबत जाऊ असं सांगत होते, म्हणून अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मग त्यावेळीही शरद पवारांची भूमिका वेगळी होती, म्हणजेच तेव्हा देखील पक्षात सगळं आलबेल होतं असं नाही", असं रोहतगी म्हणाले.

"पक्षांतर्गत निवडणूक न घेता शरद पवारांनी नेमणुका केल्या", असा आरोपही रोहोतगींनी केला. या बरोबरच "राष्ट्रवादीचे नेतृत्व हे अजित पवारांनी करावे, असे 30 जुनला भुजबळांनी सुचविले होते", अशी माहितीही रोहोतगी यांनी आयोगाला सांगितली.

अजित पवार गटाला आयोगाचे सवाल

आयोगातील सुनावणीवेळी अनेकवेळा अजित पवार गटाकडून शरद पवार यांची निवड चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीवेळी आयोगाने अजित पवार गटाला सवाल करत "शरद पवारांची निवड चुकीची आहे, तर अजित पावरांनी त्याचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाला कसं सुचवलं ? तसेच जर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाली तर त्या निवडणुकीची प्रोसिडिंग कुठे आहे ?, असे महत्वाचे सवाल केले.

दरम्यान, आजची सुनावणी आता संपली असून यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. सुनावणी संपल्यानंतर अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "आमच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे हे आयोगाला दाखवलं. पक्ष स्थापन झाला तेंव्हापासून निवडणुका झाल्या नाहीत हे आम्ही सांगितलं. ते पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे हे आम्ही आयोगाला सांगितलं", अशी माहिती रोहतगी यांनी दिली.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT