NCP Crisis News : राष्ट्रवादी कुणाची? दादांची की साहेबांची? आयोगासमोर आज सुनावणी; बोगस कागदपत्रे...

Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'शरद पवार यांचं अध्यक्षपद कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने पुढे करण्यात आले..'
NCP Crisis News
NCP Crisis NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याबाबत आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावरती शरद पवार गटाने गंभीर आरोप केले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

त्यामुळे अजित पवार गटावर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली. आज शरद पवार गटाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना चार तासांचा अवधी दिला गेला आहे. शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत पूर्णवेळ सुनावणी करणार आहेत. (Latest Marathi News)

NCP Crisis News
Ajit Pawar NCP : महायुतीत लोकसभेचा तिढा; नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही, 'या' नावांची चर्चा

आजच्या सुनावणीत संख्याबळाचा मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना वगळून उर्वरित सर्व शरद पवार समर्थक खासदारांना अपात्र करावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरूनही आयोगासमोर खल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

NCP Crisis News
Sharad Pawar News : लोकसभेच्या १६ जागांवर शरद पवार गट दावा ठोकणार; आघाडीत चल-बिचल...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार गट नेमकी काय भूमिका मांडणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटसुद्धा सक्रिय झालेला दिसून येतो. अजित पावर गटाकडून शरद पवार गटाला नोटिसा पाठवल्या गेल्या होत्या.

तर आजच्या सुनावणीत पुढची तारीख मिळेल, तेव्हा अजित पवार गटाला बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. शरद पवार यांचं अध्यक्षपद कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने पुढे करण्यात आले, याबाबतही अजित पवार गटाकडून बाजू मांडण्यात येण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com