Jayant Patil Sarkarnama
देश

NCP : परवानगी घेऊनच ते शिंदे गटात गेले ; जयंतरावांनी सांगितला एका कार्यकर्त्याचा तो किस्सा..

Jayant Patil ON Shinde Group : जयंत पाटलांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil Shocking Reaction ON Shinde Group : शिवसेनेत फूट पडून राज्यात शिदें-फडणवीस सरकार स्थापन झाले. सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अन्य पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. सोलापुरात राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दौरा सुरु आहे. अशातच सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धक्कादायक विधान केले आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटलांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे (Latest Marathi News)

जयंत पाटील म्हणाले,"एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने लोक त्यांची कामे करून घेण्यासाठी शिंदे गटात जात आहेत. अनेक जण तात्पुरते पक्षांतर करीत आहेत. नगरपालिकेला निधी मिळण्यासाठी शिंदे गटात मध्ये जातो, अशी परवानगी घेऊन काही जण सहा महिन्यासाठी शिंदे गटात तात्पुरते गेले आहेत,"

"शिंदे गटात किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणारी लोक ही पुन्हा आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. याबाबतची आताच मला माहिती मिळाली. शिंदे गटात जे गेलेले आहेत, ते तात्पुरते गेलेले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत काही सोयी-सुविधा, सवलती मिळण्याची शक्यता असल्यामुळे ते तिथे गेलेले आहेत," असे जयंत पाटील म्हणाले.

त्या कार्यकर्त्याला मी जाऊन या असे सांगितले..

राष्ट्रवादीतून शिंदे गटात जाणाऱ्या एका कार्यकर्त्यांचा किस्सा जयंतरावांनी यावेळी पत्रकारांना सांगितला. ते म्हणाले, "एका कार्यकर्त्याने तर मला सांगितले की, साहेब एक सहा महिने जातो. जरा निधी आणतो आणि परत येतो. त्या कार्यकर्त्याला मी जाऊन या असे सांगितले," नगरपालिकेच्या कामांसाठी निधी मिळावा यासाठी त्याने पक्ष सोडून तिथे प्रवेश केला आहे, असे जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

दीड वर्षांपासून खोळंबलेल्या महापालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. पण त्याआधीच सोलापुरात पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे समजते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT