Sharad Pawar News, Political News Today, NCP News, Rajkiya News sarkarnama
देश

Babri Masjid Case : बाबरीप्रकरणी काय घडलं ? ; शरद पवारांनी 'त्या' बैठकीबाबत सांगितलं..; नरसिंह रावांनी भाजपवर विश्वास ठेवला..

Sharad Pawars Big Claim : बाबरी मिशिदीला काहीच होणार नाही, असा सल्ला मी नरसिंह राव यांना बाबरी पडण्यापूर्वी दिला होता.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबरी मशीद प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीबाबत सांगितले. ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, "तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृह सचिव माधव गोडबोले यांच्यासोबत मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी विजयाराजे शिंदे यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नाही, असं आश्वासन तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना दिलं होतं. त्या मिटिंगमध्ये विजयाराजे यांनी बाबरीला काही होणार नाही, असं सांगितलं होतं. आम्ही सर्वेतोपरी काळजी घेऊ. पण पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलू नये, असं त्या म्हणाल्या होत्या,"

"भाजपवर विश्वास ठेवू नका. बाबरीला काहीच होणार नाही, असा सल्ला मी नरसिंह राव यांना बाबरी पडण्यापूर्वी दिला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. "पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला," असे पवार यांनी सांगितले.

बाबरी प्रकरणाविषयी सविस्तर तपशील नीरजा चौधरी यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे. नीरजा आणि अन्य काही पत्रकारांनी त्यावेळी नरसिंह राव यांना बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की आम्ही तसं होऊ दिलं नाही. कारण हा गंभीर घाव संपुष्टात येईल आणि भाजपच्या हातून राजकीय कार्ड निघून जाईल, असं नरसिंह राव यांनी पत्रकारांना सांगितलं होतं,"

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशी थरूर, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केलं.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT