Rahul Gandhi In Parliament : राहुल गांधींनी सांगितला रामायणातील 'तो' किस्सा ; मोदी फक्त 'या' दोघांचेच ऐकतात..

Rahul Gandhi Speech in Lok Sabha : मणिपूरमध्ये तुम्ही भारत मातेची हत्या केली
Rahul Gandhi Speech
Rahul Gandhi Speech Sarkarnama
Published on
Updated on

No Confidence Motion : "मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली,' असे विधान राहुल गांधींनी अधिवेशनात केलं. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. मोदी सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले. 'तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात,"असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी रावण, कुंभकर्ण आदींचा संदर्भ देत मोदी सरकारवर टीका केली. लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले, रावण दोनच लोकांचे ऐकत होता. त्याप्रमाणेच मोदी हे फक्त अमित शाह आणि अदानी यांचेचे ऐकतात," या विधानानंतर सभागृहात राजकीय 'रामायण' पाहायला मिळाले. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले.

राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकत नाहीत, कारण त्यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची, भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात. भारत एक आवाज आहे. हृदयाचा आवाज आहे. तो आवाज तुम्ही मणिपूरमध्ये मारला, म्हणजे मणिपूरमध्ये तुम्ही भारत मातेची हत्या केली,"

Rahul Gandhi Speech
Monsoon Session: पुन्हा खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधींनी मानले अध्यक्षांचे आभार; घाबरु नका, आज मी अदानींवर बोलणार नाही..

"मणिपूरमध्ये मी जेव्हा तिथल्या महिलेला विचारले की काय झाले तुमच्यासोबत तेव्हा तिथल्या एका महिलेने सांगितले की, माझा लहान मुलगा. एकच बाळ होत माझे. माझ्या डोळ्यांसमोर त्याला गोळी मारली. तेव्हा मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहासमोर झोपून राहिले. तेव्हा मला भीती वाटली आणि मी घर सोडले. मी सगळं काही सोडून आले. मी फक्त माझे कपडे आणले. तेव्हा त्या बाईने फोटो काढला आणि सांगितले की हेच माझ्याकडे शिल्लक आहे," असे राहुल गांधी म्हणाले.

संसदेचं पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरवात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर ते आज पहिल्यांदा लोकसभेत बोलत होते. अध्यक्षांना ते म्हणाले, "लोकसभेत मला पुन्हा घेतलं म्हणून मी आपला आभारी आहे," "आज मी अदानींवर बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, सत्ताधारी आज शांत राहू शकतात, आज मी फार टीका करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com