NCRB Data: देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या बारा वर्षातील ही आकडेवारी अतिशय भयावह आहे, कारण यात तब्बल ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०१९ च्या तुलनेत ही वाढ ३४ टक्के इतकी आहे. तर २०२३ च्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची (NCRB) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आहे. यात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
NCRBच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण १३,८९२ इतकी होतं. जी २०१३ च्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये केवळ २०१९ च्या तुलनेत ही वाढ ३४ टक्के नोंदवण्यात आली आहे. देशातील समग्र आत्महत्यांवर नजर टाकल्यास २०१३ मध्ये एकूण १.३५ लाख लोकांनी आपलं जीवन संपवलं. त्यानंतर दहा वर्षांनी २०२३ मध्ये हा आकडा १.७१ लाखांवर पोहोचला. ही आत्महत्यांची वाढ २७ टक्के इतकी आहे. २०२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण एकूण आत्महत्यांच्या प्रमाणापैकी ८.१ टक्का आहे. हा आकडा दहा वर्षांपूर्वी ६.२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे.
या क्षेत्रातील लोकांच्या सर्वाधिक आत्महत्या
व्यावसायाच्या हिशोबानं पाहिलं तर दैनंदिन आत्महत्यांमध्ये गरीब मजुरांचं प्रमाण सर्वाधिक आहे, हे प्रमाण २७.५ टक्के इतकं आहे. यानंतर गृहिणी असलेल्या महिलांचं आत्महत्यांचं प्रमाणं १४ टक्के आहे. तर स्वयंरोजगार असलेल्या लोकांचं आत्महत्यांचं प्रमाणं ११.८ टक्के इतकं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शिक्षणाचा वाढता दबाव, बेरोजगारी, मानसिक आरोग्य संबंधीत समस्या आणि कौटुंबिक तणाव ही आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाची मुख्य कारणं आहेत.
मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं काय?
मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजच्या घडीला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि सोशल मीडियाच्या दबावामुळं मानसिक आरोग्याच्या समस्या वेगानं वाढत आहेत. अनेक बाबतीत विद्यार्थी आपल्या समस्या व्यक्त करु शकत नाहीत. त्यामुळं ही परिस्थिती गंभीर बनली आहे. यावर उपाय सुचवताना तज्ज्ञ सांगतात की, विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वेळोवेळी मानसिक आरोग्याबाबत काऊन्सिलिंग होणं गरजेचं आहे. शैक्षणिक संस्थांमध्येच म्हणजेच शाळा, कॉलेज किंवा इतर शैक्षणिक अकॅडमीजमध्ये विद्यार्थ्यांच्या काऊन्सिलिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली पाहिजे. तसंच कुटुंब तसंच समाजानं देखील संवेदनशील होऊन मुलं आणि तरुणांच्या मानसिक स्थितीवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढवणं आणि हेल्पलाईन सेवांना सुदृढ करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. पण विशेषज्ज्ञांचं म्हणणं आहे की, केवळ जागरुकताच पुरेशी नाही. तर त्यासाठी प्रत्येक स्तरावर ठोस रणनिती आणि सहाय्यक वातावरण तयार होणं आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.