Upendra Kushwaha  Sarkarnama
देश

Upendra Kushwaha : उपेंद्र कुशवाह यांना 'NDA' राज्यसभेवर पाठवणार ; बिहारमध्ये दुसरा उमेदवार भाजपाचा!

Mayur Ratnaparkhe

RajyaSabha and NDA : लोकसभा निवडणुकीत 2024मध्ये काराकाट लोकसबा जागेवरून पराभूत झाल्यानंतर उपेंद्र कुशवाह यांची जी प्रतिक्रिया आली होती. त्यावरून एनडीएमधील असंतोष स्पष्टपणे दिसत होता.

अशावेळी आता एनडीए कडून उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रीय लोकमोर्चाच्या सूत्रांच्या मते उपेंद्र कुशवाह हे 21 ऑगस्ट रोजी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

21 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर दुसऱ्या जागेवर बिहारमधून भाजपने मनन कुमार मिश्र यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशावेळी एनडीएकडून उपेंद्र कुशवाह(Upendra Kushwaha) यांना राज्यसभेवर पाठवलं जाणं, म्हणजे बिहार निवडणुकीपूर्वी त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होते आहे.

याआधी उपेंद्र कुशवाह हे लोकसभा निवडणुकीत काराकाट मतदारसंघातून एनडीए(NDA)चे उमेदवार होते. येथून भोजपूरी गायक आणि अभिनेते पवन सिंह यांनीही निवडणूक लढवली होती. खरंतर पवन सिंह यांना भाजपने आसनसोल येथून तिकीट दिलं होतं. मात्र त्यांनी भाजपचं तिकीट नाकारलं आणि अपक्ष निवडणूक लढवली.

अशावेळी जेव्हा काराकाट मतदारसंघातून जेव्हा डाव्या आघाडीचे राजाराम सिंह विजयी झाले. तेव्हा उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांच्या पराभवास पवन सिंह कारणीभूत ठरले किंवा त्यांना बनवलं गेलं, हे सर्वजण जाणतात. चूक झाली की चूक करायला लावली, हे सगळ्यांना माहीत आहे. असं बोलून दाखवत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरून एनडीएमधील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे बोलेले जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT