Jitan Ram Manjhi on Champai Soren
Jitan Ram Manjhi on Champai SorenSarkarnama

Jitan Ram Manjhi on Champai Soren : 'चंपाई दा आप टाइगर थे, टाइगर हैं..' ; म्हणत जीतनराम मांझींनी 'NDA'मध्ये स्वागतही केलं!

Champai Soren News : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून चंपई सोरेन पक्षापासून दुरावल्याची चर्चा होती. तसे अप्रत्यक्ष संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले होते. आता तर यांनी आपल्या सोशल मीडियावरील जेएमएमचा उल्लेखही काढला आहे.
Published on

Jitan Ram Manjhi welcome Champai Soren in NDA : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच हवा दिली आहे. मांझी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चंपाई सोरेने हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चिन्हं दिसत आहेत.

कारण, याआधी चंपाई सोरेन(Champai Soren) यांनीही X वर पोस्ट केली होती. ज्यामुळे त्यांनी आता जेएमएमला सोडचिठ्ठी दिल्याचं दिसून येत आहे. तर इकडे मांझी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चंपाई दा तुम्ही वाघ होता, वाघ आहात आणि वाघच राहणार. NDA परिवारात तुमचे स्वागत आहे आणि शेवटी 'जोहार टाइगर' असंही म्हणाले आहेत.

Jitan Ram Manjhi on Champai Soren
Champai Soren : अखेर चंपई सोरेन यांचं ठरलं; मनातलं सगळं सांगत घेतला मोठा निर्णय...

चंपई सोरेन रविवारी सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत जेएमएमचे तीन आमदार असल्याचेही सांगितले जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पक्षापासून दुरावल्याची चर्चा होती. तसे अप्रत्यक्ष संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले होते. चंपई सोरेन यांनी आपल्या सोशल मीडियावरील जेएमएमचा उल्लेखही काढला आहे.

Jitan Ram Manjhi on Champai Soren
Hemant Soren Vs BJP : चंपई सोरेन यांच्या धक्कादायक निर्णयामुळे हेमंत सोरेन यांचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाले...

चंपई सोरेन यांनी सोशल मीडियात पोस्ट करून झारखंड मुक्ती मोर्चातून(JMM) बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्यासमोर तीन पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजकारणातून संन्यास स्वत:ची संघटना स्थापन करणे आणि इतर पक्षात प्रवेश करणे असे तीन पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com