CJP supporters gather at Jantar Mantar ahead of the proposed Parliament march over the NEET paper leak issue as security remains tight following the Delhi Police permission denial. Sarkarnama
देश

CJP Protest : मोर्चापूर्वी जंतर-मंतरवर पोलिसांनी आणला दगडांनी भरलेले ट्रक; VIDEO शेअर करत अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले, "आंदोलनकर्त्यांवर..."

NEET Paper Leak Protest : संसदेवरील मोर्चापूर्वी जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला एक डम्पर आणि काचा फुटलेली वाहन दिसून आल्याचा दावा CJPने केला आहे. यावरून पक्षाने दिल्ली पोलिसांवर आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

Jagdish Patil

CJP Parliament March : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून रविवारी (20 जुलै) संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमल्याने परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

मोर्चापूर्वी जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला एक डम्पर आणि काचा फुटलेली वाहन दिसून आल्याचा दावा CJPने केला आहे. यावरून पक्षाने दिल्ली पोलिसांवर आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी हा काही नियोजित डाव आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, दगडांनी भरलेले वाहन आंदोलनस्थळी आणण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

CJP च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही दिल्ली पोलिसांवर टीका करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी आधीच दगडांनी भरलेला ट्रक आणि खराब अवस्थेतील एक व्हॅन ठेवण्यात आल्याचा दावा करत, भविष्यात आंदोलनकर्त्यांवर तोडफोडीचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला.

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "आमच्या आंदोलनातून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. संसदेकडे निघणारा मोर्चा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने पार पडावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू देणार नाही," असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, याच आंदोलनात सहभागी असलेले पण सध्या रुग्णालयात असलेल्या सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, त्यांच्या शिष्टमंडळाला संसदेत जाऊन भूमिका मांडण्याची संधी मिळावी आणि खासदारांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. प्रकृतीमुळे ते संसदेत जाऊ शकत नसल्यास, खासदारांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशा अटी त्यांनी ठेवल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT