NEET Paper Leak: राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ चा पेपर फुटल्यानं परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यावरुन आता देशभरात अनेक प्राध्यापकांना सीबीआयनं अटक करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं हे मोठं रॅकेट असल्याचं आता उघड झालं आहे, त्याचबरोबर यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहारही झाला आहे. पण या सर्व प्रकरणाचा सर्वप्रथम ज्यांना संशय आला आणि ज्यांनी या प्रकरणात व्हिसलब्लोअरची भूमिका वठवली, ते पेशानं शिक्षक असलेले शशिकांत सुथार हे राजस्थानचे रहिवासी आहेत, त्यांनी हे प्रकरण कसं समोर आणलं याची सविस्तर माहिती दिली आहे.
एएनआयशी बोलताना शशिकांत सुथार यांनी NEET पेपर फुटीचं प्रकरणं कशापद्धतीनं समोर आलं आणि त्यात पुढे काय काय गोष्टी घडत गेल्याची याची माहिती देताना म्हटलं की, NEET चा पेपर जेव्हा पार पडला तेव्हा आम्ही पेपरचं विश्लेषण करायला घेतलं, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, माझ्या एका परिचितांनी मला एक पीडीएफ फाईल दाखवली. या पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचे काही प्रश्न होते, त्याचा आम्हा नुकत्याच झालेल्या NEET च्या पेपरशी तुलना केली तर धक्कादायक गोष्टी समोर आल्या, यामध्ये पीडीएफमधील ४५ पैकी NEETच्या ४५ प्रश्नांशी जुळणारे होते. त्यानंतर मग आम्ही त्यांनी पाठवलेल्या बायोलॉजीच्या पीडीएफची देखील NEET पेपरशी आमच्या सहकारी शिक्षकाशी तुलना करुन पाहिली तर त्यात यात देखील ९० पैकी ९० प्रश्न सारखेच होते.
पण तरीही या दोन्ही पीडीएफमध्ये अनेक प्रश्न होते त्यामुळं याला आपण याला संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणू शकतो. त्यानंतर आम्ही असे प्रश्नांचं साध्यर्म असलेले काही पुरावे गोळा करुन NTA कडं गेलो. ७ मे रोजी रात्री उशीरा आम्ही त्यांना ई-मेल केला त्यानंतर ८ तारखेला सकाळपासूनच एनटीए आणि सीबीआयकडून आम्हाला फोन आणि मेसेज यायला आम्हाला सुरुवात झाली, याबाबत त्यांनी अत्यंत वेगानं दखल घेतली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांची टीम आमच्यापर्यंत पोहोचली होती, त्यानंतर यात एसओजी देखील सामील झाली. इथं एसओजीनं देखील खूपच वेगानं हालचाली केल्या, यामुळं या सर्व गोष्टी बाहेर आल्या. देशात पहिल्यांदाच असं झालं असेल की, तीन दिवस एखाद्या पेपर लीकच्या प्रकरणाची चौकशी सुरु होते आणि चौथ्या दिवशी त्याला लीक झाल्याचं घोषित केलं जातं. यामध्ये सरकारचं, एनटीएचं सर्व चौकशी एजन्सीजचं आणि आमच्या सिकर (राजस्थान) पोलिसांचं देखील आभार मानतो. अशा प्रकारे फास्टट्रॅकवर चौकशी करुन खरंतर या चौकशी एजन्सीजनं विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य राखण्याचंच काम केलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं सरकारनं यावर तातडीनं पावलं उचलून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो.
या पेपरफुटीप्रकरणी पेपर डिझाईन करणारे शिकच गुंतलेले होते, याबाबत एक शिक्षक या नात्यानं मला हे आजिबातच अपेक्षित नव्हतं की शिक्षकांकडूनच अशा काही गोष्टी घडतील. पण काही शिक्षकांमुळं संपूर्ण शिक्षक समाज बदनाम झाला आहे. त्यामुळं मला आमच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना हा आग्रह करायचा आहे की, भविष्यात अशा गोष्टी होता कामा नयेत. आम्ही ज्या विद्यार्थ्यांना मेहनत करण्याचा सल्ला देतो त्यांची मेहनत वाया जाते, त्यांच्या रात्रीची जागरण वाया जातं. त्यामुळं जर आपण देशाला चांगले डॉक्टर देण्याचा जेव्हा दावा करतो तेव्हा यापुढं अशा गोष्टी होऊ नयेत अशी मी आशा करतो.
२०१५ मध्ये आणि २०२४ मध्ये देखील याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते, पण त्यावेळी पुराव्यांअभावी कुठलेही निर्णय घेतले गेले होते. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जे काही आदेश दिले होते ते देखील योग्यच होते. पण यावेळी आमच्याकडं याबाबत ठोस पुरावे होते त्यामुळं सरकारला अशा स्वरुपाचा निर्णय घेणं भाग पडलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.