Re-NEET UG 2026 परीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार.
विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.
3 मे 2026 मधील नोंदणी आणि परीक्षा केंद्रे कायम राहणार.
कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
नवीन Admit Card ची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्त्वाची परीक्षा NEET UG 2026 नीट परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. National Testing Agency (NTA) ने Re-NEET UG 2026 परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी आणखी काही दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
NTA ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर परीक्षेची नवी तारीख निश्चित करण्यात आली.
यंदा 21 जून रोजी होणारी NEET परीक्षा दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार असून विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचे प्रधान यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
3 मे 2026 मध्ये झालेल्या NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे याच परीक्षेसाठी कायम राहणार आहेत. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्कही भरावे लागणार नाही. आधी भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार असल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे.
नवीन प्रवेशपत्र (Admit Card) कधी जाहीर होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता फक्त NTA च्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून तपास यंत्रणांच्या चौकशीत आता महाराष्ट्र कनेक्शनही स्पष्ट होऊ लागले आहे. Pune, Nashik आणि Latur या शहरांमध्ये या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, NEET चा प्रश्नपत्रिका व्यवहार लाखो रुपयांत झाल्याचा संशय असून काही विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. पेपरफुटीमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्या मोबाईलमधील WhatsApp चॅट, कॉल डिटेल्स आणि इतर डिजिटल माहिती तपास यंत्रणांनी जप्त केली आहे. या माहितीच्या आधारे अनेक महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांकडून राज्यातील विविध भागांत छापेमारी मोहीम राबवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रातून सुरू झालेले हे नेटवर्क थेट हरियाणापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या नेटवर्ककडे जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.