Nehru-Modi_Imran Pratapgadi 
देश

Imran Pratapgadi: "नेहरुंचं नाव आईन्स्टाईनसोबत घेतलं जायचं, तुमचं नाव एपस्टिनसोबत घेतलं जातंय"; इम्रान प्रतापगडी यांचा PM मोदींवर हल्लाबोल

Imran Pratapgadi: आपल्या खास शायराना अंदाजात त्यांनी टीकात्मक शायरी सादर करत नेहरू आणि मोदी यांची तुलनाही केली.

Amit Ujagare

Imran Pratapgadi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावादरम्यान भाषण केलं. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणं काँग्रेसला आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना टार्गेट केलं. त्याचबरोबर काँग्रेसला पंतप्रधानांकडं व्हिजनच नव्हतं त्यांच्या धोरणांमुळं देशाची वाट लागली अशा कठोर शब्दांत टीका केली. पण मोदींच्या या टीकेला काँग्रेसचे खासदार आणि शायर इम्रान प्रतापगडी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपल्या खास शायराना अंदाजात त्यांनी टीकात्मक शायरी सादर करत नेहरू आणि मोदी यांची तुलनाही केली.

राज्यसभेत बोलताना इम्रान प्रतापगडी म्हणाले, संसदेच्या कॉरिडॉरमधून एकीकडं राष्ट्रपतींकडून सरकारचं कौतुक होत असताना, हसदेवच्या जंगलात आदिवासींचा उदरनिर्वाह ज्या झाडांवर अवलंबून आहे ती झाडं तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुऱ्हाडीचा आवाज माझ्या कानात घुमत होता. एकीकडं, राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान पंतप्रधान टेबलावर थाप मारत होते, तर दुसरीकडं, उत्तराखंडच्या अंकिता भंडारीसाठी न्याय मागणारे आवाज अधिकाधिक दबले जात होते. "तो व्हीआयपी कोण आहे ज्यासाठी अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली?" असा खडा सवालही यावेळी प्रतापगडी यांनी विचारला.

प्रतापगडी देशाची स्थिती मांडताना म्हणतात, "राष्ट्रपती सामाजिक न्यायाबद्दल बोलत असताना, उत्तराखंडच्या कोटद्वार इथं एका वृद्धाला जातीयवादी लोकांपासून वाचवणाऱ्या दीपक विरोधात पोलिस गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत होते. भाजपच्या नवीन भारतात, दंगलखोरांवर नाही तर शांतता आणि प्रेमाबद्दल बोलणाऱ्यांवर एफआयआर दाखल केले जातात. आसामचे मुख्यमंत्री उघडपणे संवैधानिक शिष्टाचार मोडतात आणि म्हणतात, "मुस्लिमांवर इतका अत्याचार करा की त्यांना राज्य सोडण्यास भाग पाडले जाते" बरेलीतील रिकाम्या घरात नमाज पठण करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नाताळाची तयारी करणाऱ्या ख्रिश्चन बांधवांवर गुन्हे दाखल आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये, ५० पैकी ४२ मुस्लिम मुलं NEETची परिक्षा उत्तीर्ण होतात तर त्या महाविद्यालयाची मान्यताच रद्द करण्यात येत तसंच याचा आसुरी आनंदही साजरा केला जातो" मध्य प्रदेशातील बैतुल इथं मोहम्मद नईम यांनी बांधलेल्या शाळेवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. न्यायालयाची स्थगिती असूनही वाराणसीतील दालमंडी इथं शेकडो दुकाने पाडण्यात आली आहेत, कारण रस्ता रुंदीकरण करायचं आहे.

प्रतापगडी पुढे म्हणतात, "मी असं सांगू इच्छितो की निसर्ग आपल्या वडिलधाऱ्यांविरुद्ध गैरवर्तन करणाऱ्या पिढीचाही न्याय करते. तुम्ही इंदिरा गांधी आणि पंडीत नेहरुंविरोधात अपशब्द वापरतात, पण तुम्ही कधीही नेहरूंना कमी लेखू शकणार नाहीत. कारण नेहरूंचं नाव 'आइंस्टाईन' सोबत घेतलं जायचं आणि तुमचं नाव 'एपस्टिन' सोबत घेतलं जातं" तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील. मला आणखी एक मिनिट बोलू द्या असं म्हणतं शेवटी त्यांना तालिका अध्यक्षांनी वारंवार बझर वाजवल्यानं आपलं भाषण थांबवावं लागलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT