

Anurag Thakur: माजी मंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांच्या बीसीसीआय प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. ९ वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टानं अनुराग ठाकूर यांची सुप्रीम कोर्टानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरुन हाकालपट्टी केली होती. खोट्या साक्षी आणि कोर्टाचा अवमान प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. पण आता याच सुप्रीम कोर्टानं याच प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
सुप्रीम कोर्टानं अनुराग सिंह ठाकूर यांच्यावरील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कामकाजात भाग घेण्यावरील बंदी उठवली आहे. हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ठाकूर यांच्यावर आजीवन निर्बंध लावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता किंवा ते न्याय्यही नव्हतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार, सुप्रीम कोर्टानं २ जानेवारी २०१७ च्या आपल्या निकालातील परिच्छेद २५ (ii) मध्ये सुधारणा केली आणि असं नमूद केले की, ठाकूर नियमांनुसार बीसीसीआयच्या कामकाजात भाग घेण्यास मुक्त असतील.
सुनावणीदरम्यान, कोर्टानं नमूद केलं की २ जानेवारी २०१७च्या निकालातील निर्देश ३ आणि ४ आधीच मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आजचा हा अर्ज केवळ परिच्छेद २५ (ii) अंतर्गत लादलेल्या बंदीशी संबंधित आहे. ठाकूर यांच्यावतीनं हजर असलेल्या वकिलांनी सांगितलं की, ही बंदी जवळपास नऊ वर्षांपासून लागू आहे आणि ती सुरू ठेवल्यास गंभीर अडचणी निर्माण होतील. हा युक्तिवाद स्वीकारून, खंडपीठानं हे देखील नोंदवलं की ठाकूर यांनी आधीच बिनशर्त माफी मागितली होती, जी न्यायालयाने स्वीकारली होती.
२०१७ मध्ये, देशातील क्रिकेट प्रशासनाचे भवितव्य ठरवणाऱ्या सुनावणीत भारताच्या सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरून हटवलं होतं. त्यांच्यावर खोट्या साक्षी आणि न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना सुप्रीम कोर्टाच्या आरोपांवर उत्तर मागितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.