Vidip Jadhav: अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा विमा मंजूर; कुटुंबियांना मिळणार कोट्यवधींचा आधार

Vidip Jadhav: कोणत्या कंपनीचा विमा होता आणि विम्याची किती रक्कम मंजूर झाली.
Who was Ajit Pawar’s PSO Vidip Jadhav? Mumbai Police constable who died in Baramati plane crash
Who was Ajit Pawar’s PSO Vidip Jadhav? Mumbai Police constable who died in Baramati plane crashSarkarnama
Published on
Updated on

Vidip Jadhav: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातात त्यांचे अंगरक्षक पीएसओ विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. यानंतर जाधव कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला होता, कारण पोलीस दलात कार्यरत असलेला त्यांच्या घरातील कर्ता पुरुष अशा प्रकारे त्यांना सोडून गेला होता. पण विदीप जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विमा पॉलिसीमुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. हा विमा मंजूर झाला असून त्याची रक्कम ही कोट्यवधी रुपये आहे. त्यामुळं विदीप जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यास ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.

Who was Ajit Pawar’s PSO Vidip Jadhav? Mumbai Police constable who died in Baramati plane crash
PM Modi Speech: "जेव्हा विकसित देश, विकसनशील देशांशी करार करतो तेव्हा...."; अमेरिकेच्या करारावरुन घेरणाऱ्या काँग्रेसवर PM मोदींचं उत्तर

विदीप जाधव कोण?

विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. शासनाकडून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यामुळं ते अजितदादांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अजित पवारांचा कुठेही दौरा असला की विदीप जाधव हे त्यांच्यासोबत त्यांच्या सावलीसारखे असतं. २००९ मध्ये ते मुंबई पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतर २०१४ पासून २०१९ या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात काम पाहिलं. त्यानंतर २०१९ पासून ते अजित पवारांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम पाहू लागले. पण दुर्देवानं बारामतीकडं अजित पवारांना घेऊन निघालेल्या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात पवारांसह विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला.

Who was Ajit Pawar’s PSO Vidip Jadhav? Mumbai Police constable who died in Baramati plane crash
PM Modi : काँग्रेसच्या महिला खासदार PM मोदींवर करणार होत्या हल्ला? लोकसभा अध्यक्षांच्या आरोपांनी उडवून दिली खळबळ

कोणता विमा किती रक्कम मंजूर?

विदीप जाधव यांनी न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा विमा काढला होता. इतक्या मोठ्या रक्कमेचा विमा काढण्यामागे त्यांचं धोकादायक काम हे कारण असू शकतं. सातत्यानं व्हीआयपी लोकांसोबत विमान प्रवास किंवा त्यांच्या सुरक्षेवेळी स्वतः आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्यानं त्यांनी इतक्या रक्कमेचा विमा काढला असावा, अशी चर्चा आहे. त्यामुळं मृत्यूनंतर आता विमान कंपनीनं त्यांचा १ कोटी ५ लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. यामुळं विदीप जाधव यांच्या जाण्यानंतरही या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळाला आहे. विदीप जाधव यांच्या मागे त्यांच्या पत्नी, दोन मुलं (मुलगा, मुलगी), आई-वडील असा परिवार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com