Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Nirmala Sitharaman : मोदी जेव्हा त्यांच्या खासगी डॉक्टरला घरी पाठवतात..! सीतारमण यांची 'स्टोरी' वाचली का?

Nirmala Sitharaman story : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या जीवनातील एक खास प्रसंग शेअर करताना पंतप्रधान मोदीं बद्दलचा वेगळा पैलू उलगडला आहे.

Rashmi Mane

Nirmala Sitharaman Modi connection : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर #MyModiStory या हॅशटॅगखाली देशभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी आणि सामान्य नागरिकांनी मोदींसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या जीवनातील एक खास प्रसंग शेअर करताना पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू उलगडला आहे.

अर्थमंत्र्यांनी आपल्या एक्स (X) हँडलवर #MyModiStory या हॅशटॅग सोबत एक व्हिडिओ शेअर करत. पंतप्रधान मोदींशी संबंधित एक खास आठवण सांगितली. पहिल्याच बजेट भाषणानंतरचा अनुभव सांगताना सीतारमण म्हणाल्या, “बजेट भाषण पूर्ण करून मी घरी पोहोचले आणि तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनकडे पाहिले तर तो कॉल पंतप्रधानांचा होता. कॉल रिसिव्ह करताच त्यांनी पहिल्याच वाक्यात विचारले – ‘निर्मला जी, तुम्ही स्वतःची काळजी का घेत नाही?’”

त्यांनी पुढे सांगितले की, काही क्षणातच मोदींनी आपला खासगी डॉक्टर त्यांच्या घरी पाठवला. सर्व तपासण्या करून घेण्याच्या सूचना दिल्या आणि “निर्मला पूर्णपणे निरोगी व्हावी” याची काळजी घेतली.

सीतारामन म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी हे केवळ राष्ट्राचे नेतृत्व करणारे कणखर व्यक्तिमत्त्व नाहीत, तर सहकाऱ्यांच्या आरोग्याची चौकशी करणारे, त्यांची चिंता करणारे एक संवेदनशील व्यक्ती देखील आहेत. आजही ते अधूनमधून मला विचारतात – ‘तुम्ही आपली काळजी घेत आहात का?’

त्यांनी स्पष्ट केले की, मोदींबद्दल जनतेत जी प्रतिमा आहे – ताकदवान, गंभीर आणि निर्णायक नेता – ती खरीच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यातील कोमलता, करुणा आणि मानवीयता ही देखील तितकीच ठळक आहे. “कणखरपणा आणि करुणेचं हे विलक्षण मिश्रणच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं,” असे सीतारमण म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. उद्या, देशभरात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होईल. त्याच दिवशी ‘सेवा पखवाडा 2025’ ची सुरुवात होत असून समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT