Nitesh Rane
Nitesh Rane sarkarnama
देश

जामिनावर सुटलेले नितेश राणे मोदींच्या सभेत पहिल्या रांगेत

सरकारनामा ब्यूरो

पणजी : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली. प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजच त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दोन दिवस आराम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी नंतर लगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा गाठली.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात सभा झाली. या सभेला नितेश राणे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण राणेंची प्रकृती न्यायालयीन कोठडीत असताना खालावली होती. याबद्दल ते म्हणाले होती की माझ्या तब्येतीबद्दल वेगवेगळी चर्चा करण्यात आली. मला आजही त्रास होतोय. कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी माझ्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवस दाखल होणार आहे. त्यानंतर काही दिवस मी चाचण्यांसाठी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा आणि मणक्याचा त्रास आधीपासूनच होतो. आता तो वाढलेला आहे. रक्तदाबाचा त्रास असून, साखर कमी होतेय. राजकीय आजाराचा माझ्यावर आरोप होत होता. न्यायालयीन कोठडी असल्यामुळे रुग्णालयात जाऊन बसला आहे, असे म्हणत होते. मी खोटे बोलत असेन पण माझ्या चाचण्या तर खोट्या बोलत नाहीत, असे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर मात्र, त्यांनी सिंधुदुर्गमधुन थेट गोवा गाठत मोदींच्या सभेला हजेरी लावली. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले नितेश राणे शेवटच्या रांगेत बसले होते. राणे शेवटच्या रांगेत बसले ते विरोधी पक्षनेते व गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच तेथील कार्यकर्त्यांना सुचना करुन राणे यांना पहिल्या रांगेत जागा उपलब्ध करुन दिली.

दरम्यान, सिंधुदुर्गत पोहचलेल्या नितेश राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. माझ्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? याचा विचार या निमित्ताने करायला हवा. मग आम्ही प्रश्न विचारायचे का? सरकार पडण्याची वेळ येते, ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? असे प्रश्न विचारले तर चालेल का? लतादीदींच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री स्वत गेले, असे मी ऐकले. तिथे त्यांच्या गळ्यात बेल्ट नव्हता. मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात? महाविकास आघाडीची जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांना 14 दिवस कोरोना त्यांना कसा होतो. कोणाच्या तब्येतीबद्दल आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नैतिकतेच्या चौकटीत बसते का?, असे राणे म्हणाले. (Nitesh Rane Updates)

पोलिस कोठडीत असताना नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज तातडीने नितेश राणेंनी रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT