सुटका होताच नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली असून, ते आज सिंधुदुर्गमध्ये पोचले आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजच त्य़ांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. सिंधुदुर्गमध्ये पोचल्यानंतर राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Nitesh Rane Updates)

राणेंची प्रकृती न्यायालयीन कोठडीत असताना खालावली होती. यावरून विरोधकांना सुनावत ते म्हणाले की, माझ्या तब्येतीबद्दल वेगवेगळी चर्चा करण्यात आली. मला आजही त्रास होतोय. कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी माझ्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवस दाखल होणार आहे. त्यानंतर काही दिवस मी चाचण्यांसाठी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा आणि मणक्याचा त्रास आधीही होता. आता तो वाढलेला आहे. रक्तदाबाचा त्रास असून, साखर कमी होतेय. राजकीय आजाराचा माझ्यावर आरोप होत होता. न्यायालयीन कोठडी असल्यामुळे रुग्णालयात जाऊन बसला आहे, असे म्हणत होते. मी खोटे बोलत असेन पण माझ्या चाचण्या तर खोट्या बोलत नाहीत.

माझ्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? याचा विचार या निमित्ताने करायला हवा. मग आम्ही प्रश्न विचारायचे का? सरकार पडण्याची वेळ येते, ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? असे प्रश्न विचारले तर चालेल का? लतादीदींच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री स्वत गेले, असे मी ऐकले. तिथे त्यांच्या गळ्यात बेल्ट नव्हता. मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात? महाविकास आघाडीची जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांना 14 दिवस कोरोना त्यांना कसा होतो. कोणाच्या तब्येतीबद्दल आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नैतिकतेच्या चौकटीत बसते का?, असे राणे म्हणाले.

Nitesh Rane
जामिनावर सुटताच नितेश राणे म्हणाले, मला अटक झालीच नाही!

राजकारणाचा स्तर खालावला असून, यावर विचार करण्याची वेळ आली. मला बरे वाटेपर्यंत मी आराम करणार आहे. दीड महिना मी माझ्या मतदारांशी भेटू शकलो नाही. भाजपने मला गोव्याची जबाबदारी दिली होती. तिथेही मी जाऊ शकलो नाही. बरा होऊन मी शेवटचे काही दोन-तीन दिवस तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या समितीमध्ये मला पक्षाने घेतले आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मला समितीत काम करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. तब्येत सांभाळून मी कामाला लागणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी आता बोलणार नाही. ज्या दिवशी बोलेने त्या दिवशी बऱ्याच लोकांचा बीपीचा त्रास सुरू झालेला असेल, असेही त्यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज तातडीने नितेश राणेंना रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला.

Nitesh Rane
मंत्रिपुत्राला जामीन देत उच्च न्यायालयाने पोलिसांवरच ओढले ताशेरे

न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे हृदयरोगतज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना 7 फेब्रुवारीला रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलवण्यात आले. राणेंना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com