Nitish Kumar, Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Nitish Kumar News : नितीशकुमारांचं आधीच प्लॅनिंग, इंडिया आघाडीत...! खर्गेंचा गंभीर आरोप

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार जाणार, हे आधीच माहिती असल्याचे विधान केलं आहे.

Rajanand More

New Delhi News : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर इंडिया आघाडीतील नेत्यांनाही धक्के बसू लागले आहेत. आघाडीतील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. काहींनी ‘पलटूराम’ असा त्यांचा उल्लेख केला, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमारांवर गंभीर आरोप केला आहे.

नितीशकुमारांनी (NitishKumar) आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी आज नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीतील (India Alliance) ते प्रमुख नेते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आघाडीला मोठे नुकसान होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण खर्गेंना (Mallikarjun Kharge) नितीश यांच्या जाण्याचे आश्चर्य वाटलेले नाही.

मीडियाशी बोलताना खर्गे म्हणाले, नितीशकुमारांनी हे आधीच प्लॅनिंग केले होते. केवळ इंडिया आघाडीत फूट पाडण्यासाठीच भाजप आणि जेडीयूने हे प्लॅनिंग केले होते. नितीशकुमारांनी आम्हाला, लालूप्रसाद यादव यांना अंधारात ठेवले, असा आरोप खर्गे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात अनेक आयाराम-गयाराम आहेत, असे टीका करीत खर्गे म्हणाले, आधी आम्ही एकत्रितपणे लढत होतो. मी लालू आणि तेजस्वी यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी नितीशकुमार जात असल्याचे सांगितले. आज ते खरे झाले. त्यांना थांबायचेच असते तर थांबले असते. पण त्यांना जायचेच होते. ही गोष्ट आम्हाला आधीपासूनच माहिती होती. पण इंडिया आघाडीत फूट पडू नये, म्हणून काहीच बोललो नाही, असा दावाही खर्गेंनी केला.

दरम्यान, नितीशकुमार यांनी आज नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, तर नितीश यांच्या जेडीयूमधील तीन आमदारांनी शपथ घेतली. एका अपक्ष आमदारासह हम या पक्षाच्या एका आमदाराचाही शपथविधी झाला.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT