Nitish Kumar News : अभी खेल बाकी है! तेजस्वी यादव यांच्या मनात नेमकं काय?

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव हे नितीशकुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
Tejashwi Yadav, Nitish Kumar
Tejashwi Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नवव्यांदा शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली दीड वर्षाची आघाडी तोडत नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. चार वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे जुने सहकारी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सूचक विधान करीत नितीशकुमारांना इशारा दिला आहे.

मीडियाशी बोलताना तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी संयुक्त जनता दल (JDU) हा नितीशकुमारांचा (NitishKumar) पक्ष 2024 मध्येच संपून जाईल, असे भाकित वर्तवले आहे. आम्ही महाआघाडीतच असल्याचे सांगत यादव म्हणाले, अभी खेल शुरू हुआ है, अभी खेल बाकी है. मी जे म्हणतोय, ते करणार. मी तुम्हाला लिहून देतो की, जेडीयू हा पक्ष 2024 मध्ये संपेल.

Tejashwi Yadav, Nitish Kumar
Nitish Kumar Resigns : शहांचे ते विधान ‘राजकीय जुमला’! भाजपला का हवेत ‘‘पलटू कुमार’ नितीश?

बिहारमधील (Bihar) लोक आमच्या पक्षाच्या पाठीशी असून आमच्यासोबतच राहतील, असा विश्वास तेजस्वी यांनी व्यक्त केला. भाजपने जेडीयू परत घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आम्ही मोठ्या अपेक्षेने सरकार स्थापन केले होते. नितीशकुमारांनीही त्यावेळी या सरकारचा उद्देश सांगितला होता. पण आता ते सरकारचा खून करून गेले. लोकच त्यांना जोरदार उत्तर देतील, असे यादव म्हणाले.

नितीशकुमारांना कसलेही व्हिजन नाही. ते थकलेले मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांना काम करायला लावले, अशी टीका यादव यांनी केली. बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकतो, हे आमच्या पक्षाने त्यांना दाखवून दिले. ते हे अशक्य आहेत, असे म्हणत होते. आम्ही पर्यटन, आयटी, खेळ या क्षेत्रात नवीन धोरणे आणली. भाजप आणि जेडीयूच्या १७ वर्षांच्या सत्तेत जे झाले नाही ते आम्ही १७ महिन्यांत करून दाखवले. देशात कुठेही असे काम झाले नाही, असेही सरकारचे कौतुक करताना तेजस्वी म्हणाले.

R...

Tejashwi Yadav, Nitish Kumar
Bihar Politics : उपमुख्यमंत्रिपदाचा 'महाराष्ट्र पॅटर्न' बिहारमध्ये कायम !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com