PM Narendra Modi On Manipur Incident :  Sarkarnama
देश

PM Modi On Manipur Incident : 'चुकीला माफी नाही; मणिपूर घटनेतील दोषींना अद्दल घडवणार', पंतप्रधान मोदी संतापले !

Manipur Viral Video News : नरेंद्र मोदींनी घटनेची गंभीर दखल घेत, प्रकरणातील दोषींवर कडक आणि ताकदीनिशी कारवाईचा बडगा..

सरकारनामा ब्यूरो

Manipur Violence Nrews : मणिपूरमधील हिंसक घटनांच्या मालिकेने गुरूवारी वेगळेच वळण घेतले त्यातून दोन महिलांवरील अत्याचाराबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून संसदेत विरोधक आक्रमक होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घटनेची गंभीर दखल घेत, टया प्रकरणातील दोषींवर कडक आणि ताकदीनिशी कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. त्यामुळे मणिपुरातील माहिलांवर अत्याचार करण्याऱ्यांची गय करणार नसल्याचे मोदींनी बोलून दाखवले. (Latest Marathi News)

यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, 'या घटनेत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर पूर्ण ताकदीनिशी आणि कडक कारवाई केली जाईल. महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केले आहे."

या घटनसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही या स्वत:हून दखल घेत कठोर टिप्पणी केली आहे. 'मणिपूरच्या या घटनेबाबत सरकारने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू,' असे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले. 'आतापर्यंत काय कारवाई झाली', याबाबत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. आता पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT