Watermelon Poisoning Sarkarnama
देश

Watermelon Poisoning : कलिंगड की विषारी सापळा? मुंबईनंतर ओडिशातही विषबाधेची धक्कादायक घटना; 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

13-year-old boy died and several family members were hospitalised Odisha Kendrapara district after suspected food poisoning linked watermelon or contaminated food : मुंबईतील पायधुनीतील डोकाडिया कुटुंब प्रकरण अद्याप गाजत असतानाच ओडिशातील केंद्रपाड्यात कलिंगड खाल्ल्याने आणखी एक संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Odisha Food Poisoning Case : मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूची घटना, अद्याप चर्चेत असतानाच, आता ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

केंद्रपाड्यातील एका कुटुंबातील 13 वर्षीय मुलाचा संशयित अन्नातून विषबाधेमुळे मृत्यू झाला असून, कुटुंबातील अन्य चार ते पाच सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातील विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडई ब्लॉक अंतर्गत कुपुनी गावातील सेनापती कुटुंबाने शुक्रवारी रात्री घरात बनवलेले अन्न आणि कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावत गेल्याने सर्वांना प्रथम स्थानिक आरोग्य केंद्रात (Medical Department), त्यानंतर कटक इथल्या एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान स्वाधीन सेनापती या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांच्या मते, रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर सकाळी मुलांची तब्येत अचानक बिघडली. दरम्यान, आरोग्य विभागाने प्राथमिक स्वरूपात हा अन्नतील विषबाधेचा प्रकार असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, कलिंगडामुळे विषबाधा झाली की, घरातील इतर अन्नामुळे, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही अहवालांमध्ये शिळ्या अन्नाचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे मुंबईतील (Mumbai) पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूची घटना पुन्हा चर्चेत आली आहे. एप्रिल महिन्यात डोकाडिया कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, नंतरच्या फॉरेन्सिक तपासात मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश आढळल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हा प्रकार केवळ सामान्य अन्नातील विषबाधेचा नसून, विषारी पदार्थ किंवा अन्य रासायनिक कारणांमुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. पोलिस अद्याप सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

दरम्यान, सलग समोर येत असलेल्या अशा घटनांमुळे उन्हाळ्यात फळे आणि कापलेले अन्न साठवण्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी कलिंगड किंवा इतर फळे कापल्यानंतर दीर्घकाळ उघड्यावर ठेवू नयेत, स्वच्छ धुवूनच सेवन करावे आणि शिळे अन्न टाळावे, असा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT