Watermelon Death Case Update : कलिंगड ठरलं काळ? त्या मृत्यूंमागचं धक्कादायक सत्य अखेर समोर; फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठा खुलासा!

watermelon deaths forensic report : कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या मृत्यूंचं गूढ अखेर उलगडलं. फॉरेन्सिक अहवालात समोर आले धक्कादायक खुलासे.
Watermelon Death Case Update
Watermelon Death Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

मुंबईतील पायधुणी परिसरात घडलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला अन्न विषबाधेचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र फॉरेन्सिक तपासानंतर चित्र अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचे दिसू लागले आहे.

डोकाडिया कुटुंबाने 25 एप्रिलच्या रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ल्याचे समोर आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.

Watermelon Death Case Update
LPG Price Hike : निवडणुका संपताच गॅस दरवाढीचा दणका; सर्वसामान्यांवरील खर्चाचा बोजा वाढणार...

दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या तपशीलांनी तपासाला नवे वळण दिले आहे. प्राथमिक तपासात मृतांच्या महत्त्वाच्या अवयवांचा रंग हिरवट झाल्याचे आढळले. मेंदू, हृदय आणि आतडी यांसारख्या अवयवांमध्ये असे बदल दिसणे हे सामान्य अन्न विषबाधेत सहसा आढळत नाही. तज्ज्ञांच्या मते, शरीरात एखाद्या विषारी रसायनाचा किंवा घटकाचा प्रसार झाल्यास अशा प्रकारचे परिणाम दिसू शकतात.

याशिवाय, अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात मोर्फिनचे अंश आढळल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अन्नातून झालेली विषबाधा नसून, त्यामागे औषधांचा अतिरेक, चुकीचा वापर किंवा इतर कोणताही संशयास्पद घटक असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने घरातून 11 प्रकारचे नमुने जप्त केले होते. यात बिर्याणी, कलिंगड, पाणी, कच्चा व शिजवलेला भात, चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

Watermelon Death Case Update
Shirur Bullock Cart News: निवडणूक प्रचारातील बैलगाडा शर्यत ठरली जीवघेणी; करंदीमध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

महत्त्वाची बाब म्हणजे, इतक्या कमी वेळात इतकी गंभीर विषबाधा होणे तज्ज्ञांसाठीही कोडे ठरत आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा हा प्रकार अपघाती आहे की घातपात, किंवा एखाद्या औषधाच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे झाला आहे का, या सर्व शक्यतांचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या मृत्यूमागील नेमके कारण काय हे लवकरात लवकर स्पष्ट व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com