Sulochana Das sarkarnama
देश

भाजपला दणका ; BJDच्या सुलोचना दास ठरल्या पहिल्या महिला महापैार

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाटक यांनी सुलोचना दास यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारनामा ब्युरो

भुवनेश्वर : बीजू जनता दलाच्या (बीजद) सुलोचना दास (Sulochana Das)यांची ओडिशातील (Odisha)भुवनेश्वर महापालिकेच्या (Bhubaneswar Municipal Corporation) महापैारपदी निवड करण्यात आली आहे. त्या भुवनेश्वरच्या पहिल्या महिला महापैार ( first woman mayor)ठरल्या आहेत.

राज्य निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार सुलोचना दास यांना १ लाख ७४ हजार मते मिळाली आहेत. त्यांचा ६१ हजारापेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे.

या निवडणुकीत भाजपच्या सुनीती मुंड यांचा त्यांनी पराभव केला आहे, सुनीती मुंड यांना 1 लाख 13 हजार मते मिळाली आहेत.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाटक यांनी सुलोचना दास यांचे अभिनंदन केले आहे.

बीजू जनता दलाच्या सुलोचना दास या भुवनेश्वरच्या पहिल्या महिला महापैार ठरल्या आहेत. ''मला ही संधी दिल्याबद्दल मी भुवनेश्वरच्या जनतेचे आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची मी आभारी आहे. भुवनेश्वरला स्मार्ट सिटी करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील,'' असे सुलोचना दास म्हणाल्या. सुलोचना दास या बीजू जनता दलात येण्यापूर्वी प्रदेश कॉग्रेसच्या प्रवक्ता होत्या.

भुवनेश्वर आणि बेरहामपुर या दोन महापैारपदाच्या जागा बीजू जनता दलाने पटकावल्या आहेत. संघमित्रा दलाई या यापूर्वी बेरहामपुर महापालिकेच्या महापैार होत्या. ओडिशामध्ये २४ मार्च रोजी मतदान झाले. किरकोळ हाणामारीच्या घटना वगळता याठिकाणी ६५ टक्के मतदान झाले होते. ६४११ उमेदवार रिंगणात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT