One School One ID Sarkarnama
देश

One School One ID : वन नेशन-वन स्टुडंट आयडी; विद्यार्थ्यांसाठी आता 'आधार'सारखं कार्ड, काय आहेत फायदे?

One nation one Student Card : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' तयार करण्याची योजना आखली आहे. त्याला ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR) म्हणतात.

Chetan Zadpe

Delhi News : देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आता लवकरच 'एक देश, एक ओळखपत्र' असं आधार कार्डसारखंच दस्तावेज आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी एक युनिक कोड दिला जाणार आहे. (One nation one Student Card)

यासाठी पालकांची संमती घेण्यात येणार आहे. 2020 मध्ये आणल्या गेलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा हा एक भाग आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' तयार करण्याची योजना आखली आहे. त्याला ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR) असे नाव आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शालेय विद्यार्थ्यांसाठी 'APAAR' आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. AICTE चे अध्यक्ष टीजी सीतारामन म्हणाले, “APAAR आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (NCRF) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी नवीन क्यू आर कोड ( QR Code) असेल. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या प्रत्येक कौशल्याची नोंद यामध्ये दिली जाईल.”

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना APAAR आयडी तयार करण्याची चर्चा करण्यासाठी 16 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पालक आणि शिक्षकांची बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. आधार आयडीवर कॅप्चर केलेला डेटा हा 'एपीएआर' आयडीचाही निकष असणार आहे.

यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. सरकारने आश्वासन दिले आहे, की विद्यार्थ्यांचा डेटा गोपनीय राहील आणि आवश्यक असेल तेथे फक्त सरकारी संस्थांना माहिती दिली जाईल. ज्या पालकांनी यासाठी संमती दिली आहे, त्यांना काही शंका असल्यास पालक आपली संमती मागे घेऊ शकतात.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT