ONOS Benefits News : केंद्र सरकारने नवीन वर्षांत विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन वन सब्सक्रिप्श' योजना (ONOS) लॉन्च केली आहे. या योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नोव्हेंबर 2024मध्येच मंजुरी दिली गेली होती. ज्यानंतर आता 1 जानेवारी ही लॉन्च करून रजिस्ट्रेशनही सुरू करण्यात आले आहे. ही योजना देशभरासाठी सुरू करण्यात आली आहे, अशावेळी देशातील प्रत्येक भागातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करू शकतात.
या योजनेचा मुख्य उद्देश संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण सुलभ करणे आहे. या योजनेमुळे टियर-2 आणि टियर - 3 शहरात राहणारे विद्यार्थी देखील सहजपणे यामध्ये प्रवेश घेता येईल. या योजनेस दोन टप्प्यात लागू केले जाईल, ज्यासाठी तब्बल सहा हजार कोटींचे बजट निश्चित करण्यात आले आहे.
या योजनेच्या अंतर्गत IITsसह सर्वच सरकारी अनुदानीत उच्च संस्थांमधील जवळपास 1.80 कोटी विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल. विद्यार्थी या योजनेअंतर्गत 13400 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल्स एकाच जागी मिळवू शकतात. या पोर्टलवर 6300 संस्था रजिस्टर्ड असतील. यामध्ये IIT आणि NIT सारख्या संस्थांचा समावेश असेल. हे पोर्टल पूर्णपणे डिजिटल असेल, जिथून विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि जर्नल्सचा वापर आपल्या अभ्यासासाठी करू शकतील.
दोन टप्प्यात लागू केली जाईल, One Nation One Subscription (ONOS) योजना
योजनेसाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.
13400 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल्स होतील उपलब्ध.
या योजनेचा आवाका देशव्यापी असेल.
IIT सह सर्व शासकीय अनुदान प्राप्त उच्च संस्थांच्या जवळपास 1.80 कोटी विद्यार्थ्यांना होणार फायदा
या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यकीय, व्यवस्थापन, राज्यशास्त्र आणि मानविकी विषयांसाठी 13400 पेक्षा अधिक जर्नल्स आणि संशोधन उपलब्ध असतील. त्याचा दुसरा टप्पा सार्वजनिक खासगी भागीदारी(PPP) मॉडेलच्या आधारे पुढे नेण्यात येईल. या योजनेमुळे संशोकांसाठी झपाट्याने संसधानांमध्ये सुधारणा येतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.