Bihar Politics : लालूंकडून फ्रेंडशिप रिक्वेस्ट, नितीश कुमारांचा हात तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर; काय घडतंय बिहारमध्ये?

Lalu Prasad Yadav Nitish Kumar Yadav Tejashwi Yadav NDA India Alliance : बिहार विधानसभा निवडणूक पुढील काही महिन्यांत होणार आहे.
Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patna News : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी केलेले विधान आणि नितीशबाबूंचा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबतचा एक फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार पुन्हा लालूंसोबत हातमिळवणी करणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

लालू प्रसाद यादव यांनी एका मुलाखतीत नितीश कुमार यांना थेट सोबत येण्याचेच आवाहन केले आहे. नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. नितीश आले तर सोबत का घेणार नाही? घेऊ सोबत. नितीश यांनी सोबत येऊन काम करावे. आम्ही त्यांना माफ करू, असे लालू म्हणाले होते.

Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Delhi Assembly Election : दिल्लीच्या राजकारणात दाऊदची एन्ट्री; मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली...

लालूंचे विधान केवळ माध्यमांवरील चर्चा थांबवण्यासाठी होती. त्याला जास्त गांभीर्याने घेऊ नये, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी वडिलांच्या विधानावर भाष्य केले होते. तर नितीश कुमार यांनीही या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावलेल्या नाहीत. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘ते काय बोलत आहेत, सोडून द्या,’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

या चर्चांमध्येच तेजस्वी आणि नितीश कुमारांचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. बिहारच्या राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यातील हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोमध्य तेजस्वी यादव नितीश कुमारांकडे पाहत हात जोडलेले दिसत आहेत. तर नितीश कुमार त्यांच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर मनमोकळे हास्यही दिसत आहे.

Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Bhopal Gas Tragedy : हजारो लोकांचा तडफडून मृत्यू, 40 वर्षांनंतर हलवला घातक कचरा; रात्रीत लावली विल्हेवाट

तिन्ही नेत्यांच्या विधानावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये नाराज असल्याची मागील काही दिवसांपासून चर्चा आहे. भाजप नेत्यांची एकला चलोबाबतची वक्तव्येही त्याला कारणीभूत असल्याची सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप सात-आठ महिन्यांचा कालावधी असला तरी आतापासूनच नितीश कुमारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com