Ayodhya Ram Mandir Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील सोहळ्याचे UP वगळता इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाहीच; 'हे' आहे कारण...

Ram Mandir Pratishthapana News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपकडून 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा जंगी सोहळा पार पाडला जाणार आहे.

Anand Surwase

Ayodhya Ram Temple : अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्मितीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. त्यातच येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी भाजपकडून मोठ्या उत्सवाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो श्रीराम भक्त अयोध्या नगरीमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र श्रीराम मंदिर ट्रस्टकडून या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश वगळता कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अथवा राज्यपालांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे देखील या सोहळ्याच्या आमंत्रितांच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपकडून 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा जंगी सोहळा पार पाडला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील लाखो भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज देखील यासाठी उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे मंदिर समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Aadityanath) आणि उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही.

यासाठी अयोध्येत होणाऱ्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाला प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल पाळण्यास अडचणी निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी येणाऱ्या आमंत्रितांची यादी तयार झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आमंत्रितामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, बाबा रामदेव यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील महत्वाच्या शहरामध्ये सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अयोध्येत (Ayodhya News) आरपीएफ, एसआरपीएफसह अन्य सुरक्षा दलांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशातील बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये रेल्वे सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT