Madhya Pradesh : मध्य प्रदेशात चौहान-शिंदे यांना झटका; मुख्यमंत्री मोहन यादवांच्या मंत्रिमंडळ विस्तारात...

Mohan Yadav Cabinet Expansion : त्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गोटातील केवळ 3 नव्या चेहऱ्यांना आजच्या शपथविधीत मंत्री पदाची लॉटरी लागली आहे.
Mohan Yadav
Mohan Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Political News : देशातील लोकसभा निवडणुकीच्या सेमीफायनलमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. 3 डिसेंबरला लागलेल्या निवडणूक निकालात मध्यप्रदेशमध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले.

मात्र निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना काही पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होता आले नाही. मध्यप्रदेश सरकारची धुरा मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्याकडे सोपवण्यात आली.

त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये देखील शिवराजसिंह यांच्या गटाला नमती भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाला या विस्तारात डावलण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

Mohan Yadav
Mohan Yadav : मध्य प्रदेश मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहन यादव पराभूत!

सोमवारी मध्यप्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यामध्ये एकूण 28 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात देखील भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या माजी मंत्र्यांपैकी केवळ 6 मंत्र्यांना मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तर 10 मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे.

त्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गोटातील केवळ 3 नव्या चेहऱ्यांना आजच्या शपथविधीत मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. मात्र मागील सरकारमध्ये शिंदे गटाला 7 मंत्रिपदे देण्यात आली होती. मात्र, मोहन यादव (Mohan Yadav) सरकारमध्ये सिंधिया आणि चव्हाण या दोघांचाही प्रभाव चालला नसल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्योतिरादित्य शिंदे यांनी 2020 मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येऊन या ठिकाणी सत्तांतर झाले होते. त्यानंतर त्यांती केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. तर शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली होती.

मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीपासून ते मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करेपर्यंत शिवराज सिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) या दोघांनाही डावलण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारातही या दोन्ही बड्या नेत्यांना झटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Mohan Yadav
Kamal Khan Arrested : नरेंद्र मोदीजी, माझ्या जीवास धोका..मी मेलो तर..., अभिनेत्याची ट्विटरवरून साद

दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे दिल्लीत पक्षाध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी शिवराजसिंह यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चौहान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात देखील स्थान दिले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Mohan Yadav
Mahendra Dalvi : शिंदे गटाच्या आमदाराची 'महावितरण'च्या अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com