Amit Shah: संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सध्या चर्चा सुरु असून लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तरं देताना भारत-चीन युद्धावेळी भारताच्या संसदेत झालेल्या चर्चेतील एक किस्सा कथन केला. यामध्ये नेहरुंच्या डोक्यावरच्या केसांचा उल्लेख करण्यात आला होता. आज अमित शहांनी स्वतःच्या डोक्यावरुन हात फिरवत नेहरुंचा उल्लेख करत हा किस्सा सांगितला.
शहा म्हणाले, १९६२च्या युद्धावेळी काय झालं होतं? काल काही काँग्रेसचे सदस्य चीनबाबतचा प्रश्न विचारत होते. मला आज त्यांना विचारायचं आहे की, ६२च्या युद्धावेळी काय झालं होतं? भारतानं 38 हजार स्केअर किमी जम्मू-काश्मीरमधील जमीन चीनला देऊन टाकली. हा भाग आज अक्साई चीन म्हणून ओळखला जातो. त्यावेळी देखील आज आपली चर्चा सुरु आहे त्यासारखी चर्चा संसदेत झाली होती. आत्ता मी तर खूपच गांभर्यानं यावर उत्तर देतोय, पण मला विरोधक बोलूच देत नाहीत. त्यावेळी सभागृहात चर्चेला उत्तर देताना नेहरुंनी काय म्हटलं होतं? ते म्हणाले होते, तिथं एक गवतही उगवत नाही, त्या जागेचं काय करायचं?
दरम्यान, अमित शहा म्हणाले, त्यावेळी नेहरुंचं डोकं माझ्यासारखं होतं (टक्कल). त्यावेळी एक संसद सदस्य महावीर प्रसाद त्यागी यांनी नेहरुंना विचारलं की, "तुमच्या डोक्यावरही एकही केस नाही तो चीन विकून टाकायचा का?" अशा प्रकारची उत्तरं त्यावेळी सभागृहात दिली जात होती. गांभीर्य नसलेल्या पद्धतीची उत्तरं दिली जात होती. काल गोगई मोठ्या उड्या मारुन बोलत होते. तुम्हाला माहिती आहे का? नेहरुंनी त्यावेळी आसामच्याबाबत काय म्हटलं होतं? त्यांनी आसामला आकाशवाणीवर बाय बाय म्हटलं होतं. हे संपूर्ण आसामला माहिती आहे, त्यामुळेच काँग्रेसवाले आसाममध्ये विरोधीपक्षात बसले आहेत.
शहा पुढे म्हणाले, "'सिलेक्टेड वर्ड्स ऑफ जवाहरलाल नेहरु' या पुस्तकांच्या संचामधील २९ क्रमांकाच्या खंडामधील पान क्रमांक २३१चा संदर्भ देऊन नेहरुंच्या पत्राला मी कोट करु इच्छितो. त्यावेळी अमेरिकेनं प्रस्ताव ठेवला होता की, चीनला संयुक्त राष्ट्र संघात घेतलं जावं पण सुरक्षा परिषदेवर घेता कामा नये. त्याऐवजी सुरक्षा परिषदेत भारताला घेतलं जावं. पण नेहरुंनी म्हटलं की, आम्हाला हे स्विकारार्ह नाही, कारण यामुळं चीनसोबत आमचे संबंध खराब होतील. तसंच चीनसारख्या महान देशाला वाईट वाटेल"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.