Mehbooba Mufti’s Emotional Appeal to PM Modi Sarkarnama
देश

Mehbooba Mufti: मेहबूबा मुफ्तींना रडू कोसळले! म्हणाल्या,'जगा आणि जगू द्या! मोदीजी, शहबाज शरीफांना फोन करा...'

Mehbooba Mufti’s Emotional Appeal to PM Modi:युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी मोदी जगाला सांगत होते की युद्ध करु नका, हा काळ युद्धाचा नव्हे तर संवादाचा आहे. दोन्ही देशात राजकीय संवादाची गरज आहे. मोदींनी आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना फोन करुन संवाद साधला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Mangesh Mahale

श्रीनगर: भारत-पाककडून होणाऱ्या हवाई हल्ल्याबाबत जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) मेहबूबा मुफ्ती यांनी चिंता व्यक्त केली. "दोन्ही देशामधील संघर्ष वाढला तर निष्पाप नागरिक, विशेषतः मुले मारले जातील आणि दुःखात भर पडेल. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि संवादाद्वारे संघर्ष थांबवावा," हे सांगताना त्यांना रडू कोसळले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या हल्ल्यात झालेल्या नागरिकांच्या मृतांबद्दल त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

कृपया आता हे सर्व थांबवा, अशी कळकळीची विनंती मी करीत आहे. जगा आणि जगू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्या म्हणाल्या, "युद्ध आणि हिंसाचार मानवतेच्या विरुद्ध आहे. लष्करी कारवाई हा उपाय नाही. त्यातून केवळ लक्षणे दूर केली जातात. मूळ कारणाचे उच्चाटन त्यातून होत नाही," भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि संवादाद्वारे संघर्ष थांबवावा, अशी विनंती मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी केली.

भारत-पाक दोन्ही देशांचा दावा आहे की त्यांनी एकमेकांचे लष्करी लक्ष्य साध्य केले आहे. जम्मूमधील एका ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तान करीत आहे. तर भारताचा दावा आहे की दहशतवादी अड्डे निष्प्रभ करण्यात आले आहेत. पण परस्परांकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात मृत्युमुखी पडणाऱ्या अल्पवयीन मुलांचा काय दोष? असा सवाल मेहबूबा मुफ्ती यांनी उपस्थित केला. 'जम्मू आणि काश्मीरमधील लोक यात नाहक भरडले जात आहेत. जर अणुयुद्ध सुरू झाले तर विजय मिळवण्यासाठी कोण जिवंत राहील? या त्यांच्या प्रश्नानं उपस्थित माध्यमांचे प्रतिनिधी अनुत्तरीत झाले.

सीमेवरील निष्पापांचे मृत्यू वेदनादायी आहेत. यात बळी पडलेल्या लहान मुलांनी काय अपराध केला होता. यामुळे संयम राखून तणाव कमी करण्याची तातडीने गरज आहे. सध्याची परिस्थिती हाताळताना शहाणपणाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.भारत-पाक संघर्षात निरपराधांवर मरण ओढावत आहे, हे सांगताना त्यांना रडू कोसळले.

युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी मोदी जगाला सांगत होते की युद्ध करु नका, हा काळ युद्धाचा नव्हे तर संवादाचा आहे. दोन्ही देशात राजकीय संवादाची गरज आहे. मोदींनी आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना फोन करुन संवाद साधला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

पुलवामानंतर काय झाले हे सर्वांनीच पाहिले आहे. आता पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. पुलवामा असो किंवा पहलगाम, कोणत्याही प्रदेशातील हिंसाचाराचे जागतिक परिणाम होऊ शकतात. दोन्ही देश तणावाखाली आहेत. जर हे असेच चालू राहिले तर संपूर्ण जग अराकतेत ओढले जाऊ शकते, असा इशारा मुफ्ती यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT