India-Pakistan Conflict Live: संरक्षण मंत्रालयाने लष्कर प्रमुखांना दिला मोठा अधिकार; लष्कराच्या मदतीला आता...

Operation Sindoor 2.0 Live Updates: पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु केला आहे. भारतीय सेना त्याला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात उरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर झाल्याचे समजते.
India Pakistan conflict
India Pakistan conflictSarkarnama
Published on
Updated on

पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींना रोखण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. लष्कराच्या तीन दलाच्या मदतीसाठी एक अधिसूचना काढण्यात आली आहे. या आदेशामुळे आता लष्कराच्या मदतीला राखीव सैन्याला (टैरिटोरियल आर्मी) मदतीला घेता येणार आहे, याचे अधिकार लष्कर प्रमुखांना देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार लष्कर प्रमुख या टैरिटोरियल आर्मीला मदतीसाठी बोलावू शकतात.

गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईत पाकिस्तानात पळापळ सुरु झाली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु केला आहे. भारतीय सेना त्याला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात उरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर झाल्याचे समजते.

भारत ने पाकिस्‍तानाचे अनेक शहरावर हवाई हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले आहे. लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपुर आणि पेशावर आदी शहरं उद्धवस्त झाली आहेत.

India Pakistan conflict
India-Pakistan Wars: भारत-पाक आतापर्यंत किती युद्ध? ; मुद्दा एकच तो म्हणजे काश्मीर,कोण जिंकलं

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत घेतला. भारताने सुरुवातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर, सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर या 9 ठिकाणी भारताने हल्ले करत दहशतवाद्याची तळं उद्ध्वस्त केली आहेत.

भारत-पाक तणावानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि चीनने मोठे विधान केले आहे. 'भारत-पाकच्या सुरु असलेल्या युद्धात अमेरिका सहभागी होणार नाही, ते आमचे काम नाही,'असे जेडी वेंस यांनी म्हटलं आहे.

India Pakistan conflict
India-Pakistan Tension: भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिका-चीनचे मोठे विधान

दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थितीवर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी म्हटलं आहे की अमेरिका भारत आणि पाकिस्तानाला नियंत्रित करु शकत नाही. पण दोन्ही देशांना अणुशक्तीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

गुरुवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारत-पाक तणावावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी परमाणु शक्ती वापर करु नये, कारण यामुळे मोठा संघर्ष सुरु होऊ शकतो, असे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com