Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor sarkarnama
देश

Operation Sindoor: पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर संदर्भातील सगळी उत्तरं मिळणार?सोमवारी संसदेत होणार दीर्घ चर्चा

Operation Sindoor: पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि मतदार यादी पुनरावलोकन या मुद्द्यांवर चर्चेसाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात प्रचंड गोंधळ घातल्यानं कामकाज होऊ शकलं नाही.

Amit Ujagare

Operation Sindoor: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा हा पहिलाच आठवडा असून विरोधकांनी पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकन या मुद्द्यांवर चर्चेसाठी सरकारला धारेवर धरलं. यावरुन प्रचंड गोंधळ घातल्यानं पहिल्या आठवड्याचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नव्हतं.

पण आता सोमवारी या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळं या संदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत बैठकीत चर्चेसंदर्भात सहमती झाली. त्यामुळं आता पुढचा आठवड्याचं कामकाज सुरळीत चालेल अशी आशा आहे.

ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा होणार

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कोडिकुनिल सुरेश यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, पुढील सोमवारी सभागृहात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा होईल. सुत्रांच्या माहितीनुसार, ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी कामकाजात अडथळा कमी करण्याबाबत सहमती झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि इतर अन्य पक्षांचे नेते सहभागी होते.

आजही घातला गोंधळ

सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरु केला तेव्हा त्याला ओम बिर्लांनी कामकाजात अडथळे आणणं कमी करण्याचा आग्रह धरताना म्हटलं की, विरोधकांना कुठल्या विषयावर चर्चा करायची असेल त्यांनी यावं. सरकारी पक्षाच्या सदस्यांशी चर्चा करुन अडथळे दूर करता येतील. प्रत्येक मुद्द्यावर सरकारशी चर्चा करुन मार्ग काढला जाऊ शकतो.

पंतप्रधान मोदी हजर राहणार?

ऑपरेशन सिंदूरवर सरकारनं वेळोवेळी पुरावे सादर केलेले असले तरीही अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेत, असं विरोधकांचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे एकीकडं सरकार ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडं भारताच्या प्रतिनिधीनं जाहीर करण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घोषित केली. त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे. सध्या पंतप्रधान युकेच्या दौऱ्यावर आहेत, पण ते सोमवारी भारतात असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं लोकसभा आणि नंतर राज्यसभेत हजर राहून स्वतः पंतप्रधान या प्रश्नांना उत्तर देतील असं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT