Priyanka Gandhi 
देश

Priyanka Gandhi: मोदी सरकारचा नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी विरोधकांचा प्लॅन! प्रियांका गांधींनी लगेचच केली सुरुवात

लोकसभेत 'नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३'मध्ये सुधारणा करण्यासाठीचे '१३१ वी घटना दुरुस्ती विधेयक' विरोधकांच्या एकजुटीमुळं मंजूर होऊ शकलं नाही.

Amit Ujagare

Priyanka Gandhi: विशेष अधिवेशनांतर्गत काल लोकसभेत 'नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३'मध्ये सुधारणा करण्यासाठीचे '१३१ वी घटना दुरुस्ती विधेयक' विरोधकांच्या एकजुटीमुळं मंजूर होऊ शकलं नाही. पण यामुळं चिडलेल्या सत्ताधारी पक्षानं काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला असून महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा काँग्रेस आणि इंडिया आघाडी कसं काम करत आहे, असा प्रचार केला जात आहे. पण मोदी सरकारचा हा नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी आता विरोधकांनीच वेगळा प्लॅन केला आहे. यासाठी विरोधकांकडून पंतप्रधानांना पत्रही लिहिलं जाणार आहे. प्रियांका गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत याला सुरुवात केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, काँग्रेसनं १९२८ मध्ये महिलांन आरक्षण देण्याला सुरुवात केली. काँग्रेसमुळंच भारतात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि तो आजही सुरुच आहे. पण आता भाजपकडून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधात प्रचार केला जात आहे. पण देशातील जनतेमध्ये विवेक जागृत आहे. जर यांना संपूर्ण देशभरात हे नरेटिव्ह पसरवयाचं असेल तर त्यांनी खुशाल पसरवावं पण आज देश त्या परिस्थितीत नाही जो १२ वर्षांपूर्वी होता. पण कधी कधी असंही घडतं की, जेव्हा सत्ताकाळा वाढतो तेव्हा जनता सत्ताधाऱ्यांना खरं कळू देत नाहीत. गेल्या दोन-तीन दिवसांत जी काही चर्चा झाली त्यातून सत्ताधाऱ्यांना हे समजत नाहीए की, आज भारत बदलतो आहे. भारताची जनता हे पाहत आहे, त्यांना कळतंय की कशा प्रकारे मीडियाबाजी सुरु आहे. पीआर कार्यक्रम कसे राबवले जात आहेत, हे मोठ मोठे अभियान आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे. त्यांचा हा प्रचाराचा अजेंडा आता चलत नाहीए.

काल वारंवार अमित शहा बोलत होते की, आमच्या म्हणण्यावर भरवसा ठेवा, पण कोणीही त्यांच्यावर भरवसा ठेवायला तयार नाही. खरी गोष्ट ही आहे की जनतेचा विश्वास भाजपवरुन उडून जायला लागला आहे. केवळ फेस व्हॅल्यु पाहून जनता त्यांना मतदान करणार नाही. आम्ही हे वारंवार सर्व प्लॅटफॉर्मवरुन कायमच सांगितलं आहे की, महिला आरक्षण विधेयक २०२३ जे आहे ते तुम्ही २०२९ मध्ये लागू करा त्यात काय बदल करायचे असतील ते करा, याला आमचा पाठिंबा आहे.

काल आम्ही सरकारला संसदेत पराभूत केलं आहे. जर भाजप देशभरात रस्त्यावर उतरुन काँग्रेस आणि विरोधकांना महिला विरोधी ठरवणार असेल तर आम्ही देखील आज बैठक घेऊन भाजपच्या या नरेटिव्हला कसं प्रत्युत्तर द्यायचं यावर विचार करु. त्यामुळं भाजपनं जर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीविरोधात प्रचार सुरु केला तर त्याला इंडिया आघाडीकडूनही प्रत्युतर दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT