Nanded Waghala Municipal Corporation meeting : नांदेडमध्ये सत्तेचा सारीपाट! पहिल्याच सभेत स्थायी समितीसाठी खलबतं; कोणाची वर्णी लागणार?

Nanded Municipal Meeting News : महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदावर कविता मुळे यांची बिनविरोध निवड पार पडली.
Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.
Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News: नांदेड-वाघाळा मनपाची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.16) सकाळी 11 वाजता महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. त्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच सभेत स्थायी समितीसाठी खलबतं होणार असून या सभेतच स्थायी समितीचे 16 सदस्य, स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपला (BJP)घवघवीत यश मिळाले. त्यामुळे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदावर कविता मुळे यांची बिनविरोध निवड पार पडली. त्यानंतर आता महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.16) सकाळी 11 ला महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.

Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.
BJP Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का, भाजपकडून घरातील माणूस फोडण्याची तयारी, 'भाचेबुवा' हाती घेणार कमळ?

या पहिल्याच सभेत महापालिकेतील महत्त्वाच्या स्थायी समितीचे 16 सदस्य, स्वीकृत नगरसेवक तसेच महिला व बालकल्याण समितीचे 11 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यातूनच स्थायी समितीच्या सभापतीची निवड केली जाणार असल्याने नांदेड महापालिकेच्या 'तिजोरीच्या चाव्या' कोणाकडे? जाणार यावरून नगरसेवकांमध्ये स्थायी समितीचा सदस्य होण्यासाठी जोरदार रस्सीखेच दिसत आहे.

Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.
Shivsena Case: शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरण : सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली; सरन्यायाधिशांसमोर काय काय घडलं?

नांदेड-वाघाळा महापालिकेत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने बहुमत मिळवले. कधीकाळी काँग्रेसची कायम सत्ता राहिलेल्या नांदेड महापालिकेत पहिल्यादांच कमळ फुले. परंतु या निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आपल्या बाजूने वळवले होते.

Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.
NCP News : पुणे जिल्हा ताब्यात घेण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचा फक्त एक सभापती : 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’

याठिकाणी शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले, पण त्यांच्या पाठिंब्याची भाजपला सत्तेसाठी गरजच पडली नाही. 66 जागा लढवत भाजपने 45 जिंकल्या आणि बहुमताचा जादुई आकडा त्यांनी गाठला होता. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रदेश नेतृत्वाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी भाजपला विनाअट पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुती म्हणून नांदेड महानगरपालिकेतीलसंख्याबळ आता 49 झाले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला सत्तेत कितपत वाटा दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Chavan-led BJP secures Mayor and Deputy Mayor posts in Nanded-Waghala Municipal Corporation after winning clear majority in civic elections.
Pune Congress : पुणे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : बड्या नेत्यावर तिकीट विक्री अन् जमीन हडपल्याचा आरोप: थेट राहुल गांधींना लिहिलं पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com