Co-Operative Department: राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र ‘सहकार’ विभाग; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सहकार क्षेत्राची ताकद वाढविण्यासाठी आणि कुशल नेतृत्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू करून अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : सहकार क्षेत्राची ताकद वाढविण्यासाठी आणि कुशल नेतृत्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू करून अभ्यासक्रम राबविण्यात येतील. तसेच, राज्य सहकारी संघाला प्रशिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांकडून शुल्क आकारण्याबाबतचा निर्णय आगामी पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Vikas Lawande controversy : ‘घुसखोर’ वक्तव्याने पेटली ठिणगी; राष्ट्रवादीच्या लवांडेंविरोधात कारवाईच्या मागणीचा जोर

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. प्रारंभी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार सुनील कांबळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, उपाध्यक्ष अर्जुन बोराडे, मानद सचिव रामदास मोरे, संचालक संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या वेळी उपस्थित होते.

Chandrakant Patil
Praniti Shinde: "ही तर भाजपच्या अंताची सुरुवात"; सभागृहातील सरकारच्या पराभवावर खासदार प्रणिती शिंदेंची तिखट प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘सहकाराची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्य सहकारी संघाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रशिक्षण निधी सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने सादर करावा. तसेच, राज्य संघाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी निधी देण्याबाबत अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

शिक्षण निधी पूर्ववत सुरू करा : दरेकर

सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सहकारी संघांचे बळकटीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी संघाचा बंद पडलेला शिक्षण निधी तातडीने सुरू करावा. राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी एक सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Chandrakant Patil
Navneet Rana POCSO Controversy : परतवाडा प्रकरणात खळबळ! नवनीत राणांनी उघड केली पीडितांची माहिती? अल्पसंख्याक आयोगाकडे नातेवाईकांच्या तक्रारी

सहकारी संस्थांचे नेतृत्व योग्य व्यक्तीकडे असावे : अनास्कर

सहकार क्षेत्रात उत्तम नेतृत्व घडविण्यासाठी नीतिमूल्यांची जपणूक होणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांचे नेतृत्व योग्य व्यक्तीकडे असेल, तरच सहकार क्षेत्र बळकट होईल. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सहकार संस्कृती रुजवण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘सहकाराची प्रार्थना’ समाविष्ट करावी, अशी सूचना अनास्कर यांनी केली. यावेळी आमदार कांबळे, सहकार आयुक्त तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरेकरांसाठी ‘सहकार’ची केवळ सदिच्छा

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकरांच्या नावापुढील ‘कॅबिनेट मंत्री दर्जा’ हा शब्द वगळून त्यांना सहकार खाते मिळावे, असे वक्तव्य केले. यावरून राष्ट्रवादीकडून सहकार खाते काढणार का? अशी चर्चा रंगताच, ‘मी केवळ मित्रासाठी सदिच्छा व्यक्त केल्या,’ असे स्पष्टीकरण देत पाटील यांनी यावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com