Padmini Thomas Sarkarnama
देश

BJP news : भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; आणखी एका महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा

Padmini Thomas Quits BJP, Congress, Padmaja Venugopal, Kerala BJP : आमदारकीचे तिकीट किंवा क्रिडा क्षेत्रात चांगले पद देण्याचे आश्वासनही भाजपने दिले होते. पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही, असा दावा पद्मिनी थॉमस यांनी केला आहे.

Rajanand More

Kerala Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या पद्मजा वेणुगोपाल यांनी गुरूवारीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. केरळ भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या उपाध्यक्ष पद्मिनी थॉमस यांनी पक्षाला रामराम ठोकत असल्याची घोषणा केली. पक्षाने आपल्याला दिलेले आश्वासन पाळले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला आहे.

पद्मजा वेणुगोपाल या केरळचे माजी मुख्यमंत्री करुणाकरन यांच्या कन्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये जाणे आपली वैयक्तिक चूक होती, असे सांगत राजीनामा दिला आहे. आता पद्मिनी थॉमस यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले आहे. त्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्याकडे आपला राजीनामा देणार आहे. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थॉमस या दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्या अर्जून पुरस्कारप्राप्त माजी खेळाडू आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिडा किंवा राजकारणात अधिक सक्रीयपणे काम करता येईल, या अपेक्षेने भाजपमध्ये गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण तिथे आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने पक्ष सोडत असल्याचे थॉमस यांनी स्पष्ट केले आहे.

आमदारकीचे तिकीट किंवा क्रिडा क्षेत्रात चांगले पद देण्याचे आश्वासनही भाजपने दिले होते. पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही, असा दावाही थॉमस यांनी केला आहे. पद्मिनी थॉमस यांनी काही दिवसांपूर्वीर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

काँग्रेसमध्ये घरवापसी

पद्मिनी थॉमस यांनी काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छाही व्यक्त केली. मी काँग्रेसच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये परतणार असून पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. पद्मजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय आणि माझ्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. मी मागील एक वर्षापासून पक्षापासून दूरच आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणतीही अट घातलेली नाही, असे थॉमस यांनी स्पष्ट केले. पद्मजा वेणुगोपाल याही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT