Rajasthan ZP Election Results : काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजप पिछाडीवर, मंत्र्यांच्या पत्नी, आमदाराच्या लेकाचा पराभव

Rajasthan Zila Parishad Election Results 2026 : राज्याची राजधानी असलेल्या जयपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष रमा चोपडा यांचा पराभव झाला आहे.
BJP | Congress | Rajasthan Zila Parishad Election Results
BJP | Congress | Rajasthan Zila Parishad Election ResultsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan Election Results : राजस्थानमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यातील ३७ झेडपी आणि ४१९ पंचायत समित्यांमधील सुरूवातीचे कल हाती आले असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार ७ जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस तर पाच ठिकाणी भाजप आघाडीवर आहे.

पंचायती समित्यांच्या निवडणुकीत भाजपची मोठी पीछेहाट झाली आहे. आतापर्यंत ४६६ जागांचे निकाल हाती आले असून काँग्रेसचे २३३ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप काँग्रेसच्या जवळपासही नाही. भाजपचे आतापर्यंत केवळ १४३ उमेदवार विजयी झाले आहेत. सध्यातरी काँग्रेसने १२० पंचायत समित्यांमध्ये सत्ता काबीज करण्याच्यादृष्टीने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपला जेमतेम ६० पर्यंत पोहचता आले आहे.

मंत्र्‍यांच्या पत्नीचा पराभव

सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे नगरविकास मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी शांती देवी पराभूत झाल्या आहेत. त्यांचा काँग्रेसच्या सरिता जाट यांनी ५१ मतांनी पराभव केला. तर उदयपूर मधील गिर्वा पंचायत समितीमध्ये माजी मंत्री खेमराज कटारा यांची एन्ट्री झाली आहे. याच जिल्ह्यातील ऋषभदेव पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नानालाल अहारी यांचे पुत्र सोनू यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

BJP | Congress | Rajasthan Zila Parishad Election Results
BJP news : भाजपला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीची सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये घरवापसी? म्हणाल्या, भाजपमध्ये जाणे माझी चूक...

टपाली मतांमध्ये काँग्रेसचा विजय

धौलपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. ईव्हीएम मशीनमध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना प्रत्येकी २२४४ मते मिळाली. अखेर टपाली मतांची मोजणी केल्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.

BJP | Congress | Rajasthan Zila Parishad Election Results
MLA VS Babu Death : मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आमदाराचे निधन; देशभरात 'जायंट किलर' म्हणून आले होते चर्चेत

जयपूरमध्ये काँग्रेस

राज्याची राजधानी असलेल्या जयपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष रमा चोपडा यांचा पराभव झाला आहे. याच निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन डागर यांना पराभव पत्करावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.