India-Pakistan Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानविरोधात भारताचं युद्धाच्या दिशेनं मोठं पाऊल, शस्त्रसंधी रद्द करण्याच्या हालचाली?

Pahalgam Terror Attack India Vs Pakistan : पाकिस्तानाला फक्त राजनैतनिक स्तरावर नव्हे तर लष्करी स्तरावर देखील धडा शिकवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.

Roshan More

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर इशारा दिला आहे. कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ. उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ, असे पंतप्रधान म्हटले आहेत. त्यामुळे या इशाऱ्याचा गर्भीत अर्थ पाकिस्तानावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारत पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी रद्द करण्याचा गांभीर्याने विचार करतो आहे. शस्त्रसंधी रद्द करणे म्हणजे युद्धाचे दिशेने टाकलेले पहिले मोठे पाऊल असेल.

शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानने सीमारेषेलगतच्या भागात हल्ला न करण्याचे वचन पाळले नाही. त्यामुळेच शस्त्रसंधी हटवण्याचा वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली होती. मात्र, पाकिस्तानच्या पाठींब्याने लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि लहानसहान आंतकवादी संघटनाकडून छोटे मोठे हल्ले सुरुच होते.

लष्कराची तयारी सुरू?

एका मराठी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की लष्कर प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र, कारवाई नेमकी काय असेल याची माहिती स्पष्ट नाही. पाकिस्तानाला फक्त राजनैतनिक स्तरावर नव्हे तर लष्करी स्तरावर देखील धडा शिकवण्याची तयारी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

ड्रोन आणि तोफा तैनात

सीमेपलिकडेचे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी 28 ते 30 किलोमीटरच्या अंतरापर्यंत मारा करू शकतील, अशा तोफा एलओसीवर तैनात करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे उडवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर विचारधीन असल्याची चर्चा आहे.

सर्जिकल स्ट्राईक नव्हे छोटे युद्ध

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना पाठींबा असल्याचे पुरावे भारताला मिळाले आहेत. त्यामुळे केवळ केवळ सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना धडा शिकवण्यात येणार नाही, तर पाकिस्तानलाही ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. यासाठी सीमेवर पूर्ण युद्ध न करता, कारगिलप्रमाणे मर्यादित लढाया करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT