
Nagpur News : पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत निसर्गाचा आनंद घेत असताना नागपूरच्या रुपचंदानी कुटुंबाला अचानक फायरिंगचा आवाज आला. त्यामुळे सर्व कुटुंब प्रचंड घाबरले. ते सर्व जंगलाच्या दिशेने पळत सुटले. वाटेत आलेला पहाड ओलांडताना सिमरन रुपचंदानी पहाडावरून घसरून खाली पडल्या. त्याही अवस्थेत आपला जीव मुठीत धरून आठ किलोमीटर जंगलाचा रस्ता पार केला आणि संपूर्ण रुपचंदानी कुटुंब अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बचावले.
काश्मीरमध्ये पर्यटनाला गेलल्या रुपचंदानी कुटुंब गुरुवारी नागपूरला सुखरुप पोहचले. घरी आल्यानंतर तेथील थरारक अनुभव सांगताना सर्वच कुटुंब शहारून गेले होते. रुपचंदानी कुटुंबाने तिथे घडलेली आपबिती कथन केली. तिलक रुपचंदानी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हल्ला करण्याच्या पाच मिनिटापूर्वी स्वित्झर्लंड म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये आम्ही निसर्गाचा आनंद घेत व्हिडिओ घेत काढत होतो. त्यानंतर लागलीच पाच मिनिटानंतर दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला.
हल्ला केल्यानंतर आम्ही तिघेही त्या ठिकाणाहून जीव वाचविण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावत सुटलो. यामध्ये सिमरन या पहाडावरून घसरून पडल्याने त्या जखमी झाल्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, त्याही अवस्थेत आपला जीव मुठीत धरून त्यांनी आठ किलोमीटर जंगलाचा रस्ता पार केला. त्यांनतर आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचलो. यावेळी माझा मुलगा गोपाल याने दिलेल्या हिमतीमुळे आम्हाला धीर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा तिलक रुपचंदानी आपल्या कुटुंबासोबत पहलगामच्या बैसरन व्हॅलीत होते.
तिलक रूपचंदानी म्हणाले, 'हल्ला झालेल्या ठिकाणी चारशे ते पाचशे लोक होते. मुलगा गोपालने आम्हा दोघांना सोडून जाणार नाही अशी भूमिका घेतली. आम्ही दोघेही सिमरनला खांद्यावर घेऊन बाहेर पडलो. त्या ठिकाणी सर्वच लोक जीव वाचविण्यासाठी पळत सुटले होते. हल्ला झालेल्या ठिकाणी पोलिस सुरक्षा नव्हती. त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा होता. त्या दरवाजाच्या जवळपास आम्ही होतो. मी एक्झिट गेटवर उभा असताना फायरिंगचा आवाज आल्याचे रुपचंदानी यांनी सांगितले.
संपूर्ण व्हॅलीतील पर्यटक हे मागच्या गॅलरीबाहेर निघण्यासाठी एकमेकांना धक्का देत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नरत होते. यात सगळे जंगलाच्या दिशेने जीव वाचविण्यासाठी पळत सुटले. त्या घटनेतून बचाविल्यानंतर आम्हाला नागपूरला परतण्याचे तिकीट मिळत नव्हते. आमची विकी कुकरेजा आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मुंडे यानी मदत केली. आम्ही मुंबईत आलो आणि तेथून आपल्या घरी परतलो, अशी आपबीती रुपचंदानी यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.