"Destruction in Tirah Valley after Pakistan Air Force JF-17 fighter jets dropped LS-6 bombs on villages, killing civilians including children." Sarkarnama
देश

Pakistan Airstrikes : पाकिस्तानी लष्कराचं ‘ऑपरेशन’ उलटलं; आपल्याच नागरिकांवर एअरस्ट्राइक, 30 जणांचा मृत्यू

Pakistan Air Force Airstrikes in Tirah Valley : पाकिस्तानी लष्कराने आपल्याच नागरिकांवर हा हल्ला का केला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सरकारकडून तसेच लष्कराकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Rajanand More
  1. कैबर पख्तूनख्वा प्रांतातील मत्रे दारा गावावर पाकिस्तानी लष्कराच्या जेएफ-17 लढाऊ विमानांनी हल्ला केला, ज्यात 30 हून अधिक नागरिक ठार झाले, त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.

  2. गावातील निम्म्याहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली, नागरिकांनी स्वतःच बचावकार्य सुरू केले, तर प्रशासनाने नंतर मदतकार्य सुरू केले.

  3. लष्कराने हा हल्ला का केला याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, मात्र दहशतवाद विरोधी कारवाईच्या नावाखाली हा हल्ला झाला असावा, अशी चर्चा आहे.

Pakistan Air Force bombing : पाकिस्तानी लष्कराने आपल्याच नागरिकांवर हवाई हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुमारे 30 हून पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पाकिस्तानी सरकार तसेच लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एअरस्ट्राइक करण्यात आल्याचे समजते.

पाकिस्तानातील कैबर पख्तूनख्वा प्रांतातील मत्रे दारा गावावर लष्कराच्या जेएफी-17 लढाऊ विमानांनी सुमारे आठ एलएस-6 बॉम्ब टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये निम्मे गाव बेचिराख झाले असून महिला, लहान मुलांसह 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश अधिक आहे.

हल्ल्यातून बचावलेल्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री जोरदार आवाज ऐकू आल्याने लोक खडबडून जागे झाले. अचानक एका मागोमाग एक धमाके होऊ लागले. आजूबाजूची घरे उद्धवस्त झाली होती. सगळीकडे नुसते पडझड झालेल्या घरांचे ढीग दिसत होते. रस्ते उघडले होते. आगीचे लोट दिसत होते. महिला, लहान मुलांचा आक्रोश कानी पडत होता.

गावात सगळीकडे भीतीचे वातावरण होते. स्थानिकांनीच तातडीने बचावकार्य सुरू केले. पण रात्रीची वेळ आणि सर्वत्र गोंधळाची स्थिती असल्याने त्यात अनेक अडथळे येत होते. ढीग उपसण्याचे काम सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. आजूबाजूच्या गावातील लोक तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही गावात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने आपल्याच नागरिकांवर हा हल्ला का केला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सरकारकडून तसेच लष्कराकडूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. लष्कराकडून दहशतवाद विरोधी कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. पण आपल्याच नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाकिस्तानी लष्कराच्या नाकर्तेपणावर टीका होऊ लागली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: हा हल्ला कुठे घडला?
A: पाकिस्तानातील कैबर पख्तूनख्वा प्रांतातील मत्रे दारा गावात.

Q2: हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला?
A: किमान 30 नागरिक ठार झाले, ज्यात महिला आणि लहान मुले आहेत.

Q3: हल्ल्यात कोणती शस्त्रे वापरण्यात आली?
A: जेएफ-17 लढाऊ विमानांतून आठ एलएस-6 बॉम्ब टाकण्यात आले.

Q4: लष्कराने हल्ल्याचे कारण काय सांगितले आहे?
A: अद्याप कोणतेही अधिकृत कारण जाहीर केलेले नाही, पण दहशतवाद विरोधी कारवाईचा संदर्भ दिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT