Pakistan Afghanistan conflict : अमेरिका-इस्राइल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात चिंतेंच वातावरण असतानाच आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला आहे.
कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील विविध ठिकाणी हवाई हल्ले केले असून या हल्लात चौघांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने कंदाहार विमानतळा जवळील खासगी विमान कंपनीच्या तेल साठ्यावर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्काराने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या तळाला अचूक लक्ष्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तान तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येतो.
मात्र, अफगाणिस्तानने हे दावे फेटाळत अफगाणिस्तानच्या जमिनीची वापर दुसऱ्या देशावर हल्ले करण्यासाठी केला जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या असल्याचा दावा देखील तालिबान सरकारने केला आहे. दरम्यान, पाकिस्तानने काबूलमधील नागरी वस्तीत बॉम्ब हल्ला केल्याची माहिती काबूल पोलिसांनी दिली आहे.
या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून 15 नागरिक जखमी झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. तर तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी एक्सवर पोस्ट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. दक्षिणेकडील कंदाहार प्रांत पक्तिया आणि पक्तिका या पूर्वेकडील प्रांतांवरही पाकिस्तानने हल्ला केल्याची माहिती तालिबानने दिली आहे. तर आता पाकिस्तानच्या या हल्ल्याला तालिबान कशा प्रकारे प्रत्यु्त्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.