Israel Iran conflict : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच PM मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन; म्हणाले, 'अखंड वाहतूक...'

PM Narendra Modi speaks with Iran President : या चर्चेत शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करत सध्याच्या तणावावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन मोदींनी केलं आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये अशा वेळी चर्चा झाली, जेव्हा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद केली आहे.
Prime Minister Narendra Modi speaks with Iran President Masoud Pezeshkian
Prime Minister Narendra Modi speaks with Iran President Masoud Pezeshkian over the phone to discuss rising Middle East tensions and the impact of the Strait of Hormuz crisis on global energy routes.Sarkarnama
Published on
Updated on

Strait of Hormuz crisis : अमेरिका-इस्राइल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कारण दिवसेंदिवस या देशांमधील तणाव वाढत आहे. या युद्धामुळे जगावर मोठं संकट ओढावलं आहे. याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या युद्धाच्या गंभीर परिस्थिती संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे हे युद्ध सुरू झाल्यानंतर मोदी आणि पेजेशकियन यांच्यात पहिल्यांदाच थेट चर्चा झाली आहे. तर पेजेशकियन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.

यावेळी मोदींनी सांगितलं की, या चर्चे दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल आणि नागरिकांचे होत असलेले मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचे होत असलेल्या नुकसान या बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तर भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता तसेच वस्तू आणि ऊर्जा पुरवठ्याची अखंड वाहतूक कायम ठेवणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Prime Minister Narendra Modi speaks with Iran President Masoud Pezeshkian
Rahul Gandhi: अजित पवारांना न्यायासाठी आता राहुल गांधी मैदानात! भेटीनंतर रोहित पवारांनी सांगितली स्ट्रॅटेजी

तसंच शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करत सध्याच्या तणावावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केल्याचा दावाही मोदींनी केला आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये अशा वेळी चर्चा झाली, जेव्हा इराणने होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद केली आहे. त्यामुळे आता या चर्चेमुळे भारताला इराणकडून काही सूट मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

कारण काल इराणकडून भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर अयातुल्ला मोजतबा खामेनाई यांनी देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं.

Prime Minister Narendra Modi speaks with Iran President Masoud Pezeshkian
Meghalaya Violence : मणिपूरनंतर आता ईशान्य भारतातील आणखी एका राज्यात हिंसाचार पेटला, कर्फ्यू लागला, बीएसएफच्या जवानांवरच हल्ला

यावेळी त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद राहायला हवं आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद करण्याचा राजनैतिक लाभ घ्यायला हवा, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना वाहतूक कऱण्याची मुभा मिळणार की पुन्हा देशावर इंधन टंचाईचं संकट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com