India-Pakistan War News : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची चरपड वाढली आहे. त्यांनी ड्रोनने भारतीय सीमेलगतच्या 15 शहरांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ला केला. हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तान लष्कराचे पाच विमानतळ उद्ध्वस्त केले.
इशाक डार यांनी जिओ न्यूजशी संवाद साधताना म्हटले, ' आम्हाला शांतता हवी आहे. भारताने त्यांच्या आक्रमकतेचा आवार घालायला हवा. भारत थांबलातर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाचे समर्थक नाही. संपत्तीचे आणि आर्थिक नुकसान आम्हाल नकोय. अशा परिस्थितीत जर भारत थांबला तर परिस्थिती ठीक होऊ शकते कारण मग पाकिस्तानकडूनही हल्ला केला जाणार नाही.'
भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानकडून अणूबाॅम्बच्या वापरासंदर्भात बैठक घेतली असल्याची चर्चा होती. मात्र, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आसिफ यांनी सांगितले की राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची सध्या कोणतीही बैठक होणार नाही; हे प्राधिकरण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे व्यवस्थापन करते.
पाकिस्तानचे योजना मंत्री अहसान इक्बाल यांनी देखील आपल्या भारतासोबतचा तणाव कमी करण्याची आवश्यकता असले म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, 'आम्ही अपेक्षा करतो की भारत संवादाच्या दिशेने पुढे जात तणाव कमी करण्यासाठी काम करेल. जग दोन अणुशक्तींच्या दरम्यान युद्ध पाहू इच्छित नाही. अशा परिस्थितीत तणाव कमी करून संवादावर भर दिला जाईल.'
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत फोनवर संवाद साधला त्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत त्यांनी फोनद्वारे संवाद साधला. दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा आणि युद्ध टाळण्याविषयी ते बोलले असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.