Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या, ‘मी एकटी...’

Sharad Pawar Statement : शरद पवार यांनी काय म्हटलं आहे? याबाबत मला माहिती नाही. प्राप्तीकराच्या नव्या कायद्यासंदर्भात दिल्लीत बैठक हेाती, त्या बैठकीसाठी मी दिल्लीत होते.
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 10 May : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही. एकत्र यायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असे विधान केले होते. पवारांच्या त्या विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता खुद्द सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया आली असून दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही, असे सुळेंनी स्पष्ट केले आहे.

पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, तर मला आश्चर्य वाटणार नाही. दोघांनी एकत्र यायचं की नाही, याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. तसेच, सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचं? याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, अशी विधाने पवार यांनी केली आहेत. साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवारांच्या विधानावर भाष्य केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार (Sharad Pawar) यांनी काय म्हटलं आहे. याबाबत मला माहिती नाही. प्राप्तीकराच्या नव्या कायद्यासंदर्भात दिल्लीत बैठक हेाती, त्या बैठकीसाठी मी दिल्लीत होते. पण पवारांनी कोणत्या संदर्भाने हे विधान केले आहे, हे बघावे लागेल. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतचा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. त्याबाबत मला कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. त्याबाबतचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून घ्यावा लागेल.

Supriya Sule
Maharashtra Politic's : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, ‘ते फार गंभीर आहे...’

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे विविध कार्यक्रमांच्या निमित्त एकत्र येत असतात. ते एकमेकांना भेटत असतात. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. त्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. संघटनेत काम करत असताना एका व्यक्तीला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णयही सर्वांशी विचारविनिमय करूनच घ्यावा लागेल.

Supriya Sule
India Pakistan War : घरातच थांबा, दारांमध्ये, खिडक्यांजवळ उभं राहू नका; ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केले नवे आदेश

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात इंडिया आघाडीचा चांगला समन्वय असतो. सर्वपक्षीय बैठकीसाठी आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र गेलो होतो. आमच्या सगळ्यांचा एकत्रित निर्णय होतो. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत, असे उत्तरही इंडिया आघाडीतील समन्वयबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com